३०जीवघेणे फ्रॅक्‍चर्स झालेल्‍या ४६ वर्षीय अपघा तग्रस्‍त व्‍यक्‍तीला मिळाले जीवनदान


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : ४६ वर्षीय अपघातग्रस्‍त व्‍यक्‍तीला फोर्टिस हॉस्पिटलमधील डॉक्‍टरांनी नवीन जीवनदान दिले. त्‍याच्‍या बरगड्या व पाठीच्‍या कण्याला फ्रॅक्‍चर्स होण्‍यासोबत फुफ्फुसाचा भाग व शरीराच्‍या कंबरेवरील भागाला दुखापत होत ३० हून अधिक फ्रॅक्‍चर्स झाले होते. जगण्‍याच्‍या कमी शक्‍यतेमुळे रूग्‍णाची स्थिती स्थिर होण्‍यासाठी चार दिवस लागले आणि यामध्‍ये बहुशिस्‍तबद्धीय टीमचा हातभार देखील होता. योग्‍य 'डॅमेज कंट्रोलउपायांसोबत योग्‍य देखभाल घेतल्‍यामुळे रूग्‍णाची स्थिती लवकर स्थिर झाली.  


किरण जाधव  सायंकाळच्‍या वेळेला ऑटोरिक्षामधून टिटवाळा येथील मंदिरामध्‍ये जात असताना ऑटोरिक्षा एका भरधाव वेगाने येणा-या ट्रकवर आदळून अपघात झाला. रूग्‍णाला सुरूवातीला स्‍थानिक हॉस्पिटलमध्‍ये नेण्‍यात आलेपण त्‍याची गंभीर स्थिती पाहून त्‍याच्‍या सहका-यांनी त्‍याला मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलमध्‍ये आणले.


रूग्‍णाला आमच्‍या इमर्जन्‍सी रूममध्‍ये आणण्‍यात आले तेव्‍हा त्‍याची स्थिती खूपच गंभीर होती. त्‍याचे डोके व पाठीच्‍या कण्याला जवळपास १० जीवघेण्‍या दुखापती होण्‍यासोबत छाती व पोटाच्‍या भागाला देखील दुखापती झाल्‍या होत्‍या. मोठ्या प्रमाणात रक्‍तस्‍त्राव झाल्‍यामुळे त्‍याला हायपोवोलेमिक शॉकफॅट इम्‍बोलिझमएआरडीएसकिडनी फेल्युअरस्‍नायूंना दुखापती झाल्‍या होत्‍या. अशा दुखापतींमध्‍ये अपघातग्रस्‍त व्‍यक्‍तीचा मृत्‍यू होण्‍याची शक्‍यता अधिक असते,'' असे मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटल्‍सचे वरिष्‍ठ सल्‍लागार- जॉइण्‍ट रिप्‍लेसमेंट सर्जन डॉ. सचिन भोसले म्‍हणाले.


या रूग्‍णाची स्थिती पाहिल्‍यानंतर कोणालाही धक्‍का बसला असता आणि त्‍याचा उपचार कसा सुरू करावा हे समजले नसतेइतकी त्‍याची स्थिती गंभीर होती. रूग्‍णाला पुढील जटिलता टाळण्‍यासाठी प्रथम स्थिर करावे लागले. अशा प्रकारचे ५० टक्‍के अपघातग्रस्‍त व्‍यक्‍ती वाचत नाहीतबहुतांश अपघात झाल्‍याच्‍या पहिल्‍या तासामध्‍येच मृत पावतात. म्‍हणूनच 'गोल्‍डन अवर', म्‍हणजेच 'डॅमेज कंट्रोल ऑर्थोपेडिक्‍सअत्‍यंत महत्त्वाचे आहेअसे डॉ. सचिन भोसले पुढे म्‍हणाले.


''या गृहस्‍थाला आमच्‍या ट्रॉमा सेंटरमध्‍ये आणल्‍यानंतर आम्‍ही सीटी स्‍कॅन केलेज्‍यामधून पुष्‍टी मिळाली कीत्‍याचा फुफ्फुसाचा भाग फाटला होता आणि छातीची पोकळी हवा व रक्‍ताने भरलेली होती. आम्‍ही प्रथम फुफ्फुसावरील दबाव कमी करण्‍यासाठी आणि रक्‍त बाहेर काढण्‍यासाठी त्‍याच्‍या छातीमध्‍ये ड्रेन ट्यूब टाकली. त्‍यानंतर आम्‍ही त्‍याच्‍या फ्रॅक्‍चर्सवर पट्टी लावली आणि त्‍याला ट्रॉमा आयसीयूमध्‍ये हलवले. पहिल्‍या २४ ते ४८ तासांमध्‍ये हायड्रेशनश्‍वासोच्‍छ्वासऑक्सिजनेशनरक्‍त संक्रमणशॉक टाळणे आणि किडनीचे कार्य बंद होणे याबाबत देखरेख करण्‍यात आली. 


आयसीयू टीमने आयव्‍ही फ्लूईड्सऑक्सिजन पुरवठाअॅण्टिबायोटिक्‍सपेनकिलर्सब्‍लड थिनर्स आणि विविध घटकांच्‍या सातत्‍यपूर्ण देखरेखीच्‍या माध्‍यमातून ही बाब साध्‍य केली. तिस-या दिवशी रूग्‍णाची स्थिती स्थिर झाली आणि आम्‍ही तेव्‍हा त्‍याच्‍या फ्रॅक्‍चर्सचा उपचार करण्‍याचे ठरवले. हातापायांना झालेल्‍या फ्रॅक्‍चर्समुळे हातपाय गमावण्‍याचा आणि मृत्‍यू होण्‍याचा धोका होता. चौथ्‍या दिवशी आम्‍ही आमच्‍या डॅमेज कंट्रोल टप्‍प्‍यामध्‍ये यशस्‍वी ठरलो,'' असे डॉ. भोसले पुढे म्‍हणाले.


रूग्‍णाला जीवनाचा उत्तम दर्जा देण्‍यासाठी योग्‍य देखभाल घेणे महत्त्वाचे होते. अर्धा दिवस शस्‍त्रक्रिया करण्‍याचे नियोजन करण्‍यात आले. डॉ. भोसले यांनी संपूर्ण हातावर डेल्‍टो-पेक्‍टोरल उपचार केलाज्‍यामध्‍ये खांद्यामधील सांधे खुले करून फ्रॅक्‍चर्सच्‍या उपचारासाठी हात व शरीराच्‍या इतर भागांच्‍या हालचालींची तपासणी करण्‍यात आली आणि हाडे जोडण्‍यासाठी स्‍क्रू व प्‍लेट्स अशा इम्‍प्‍लाण्‍ट्सचा वापर करण्‍यात आला. 


खांद्यामधील सर्व हाडेहाताचे हाड ते तळहातामधील हाड व मनगटापर्यंतची हाडे एकत्र जोडण्‍यात आली. या मोठ्या शस्‍त्रक्रियेनंतर रूग्‍णावर पुनर्वसन व फिजिओथेरपी करण्‍यात आली. रूग्‍ण आता बरा झाला आहे आणि स्‍वत:हून चालण्‍यासोबत हालचाल करू शकत आहे. डॉ. भोसले यांनी रूग्‍णाची स्थिती स्थिर करण्‍यासाठी डॅमेज कंट्रोल ऑर्थोपेडिक्‍स केले आणि योग्‍य शस्‍त्रक्रियेमुळे रूग्‍ण एका आठवड्यामध्‍येच स्‍वत:हून घरी चालत जाऊ शकला. ते पुढे म्‍हणाले,


मी मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलमधील डॉक्‍टरांचे आभार मानतो. त्‍यांनी मला नवीन जीवनदान दिले आहे. माझ्या सहका-यांनी मला सांगितले कीमला येथे हॉस्पि‍टलमध्‍ये आणण्‍यात आले तेव्‍हा माझी स्थिती खूपच गंभीर होती. माझी वाचण्‍याची शक्‍यता खूपच कमी होती. डॉ. भोसले यांच्‍या टीमने सर्वतोपरी प्रयत्‍न करून मला वाचवले आणि मी आता उत्तमप्रकारे जीवन जगत आहे. माझे कुटुंब आणि मी डॉक्‍टर्स व माझ्या सहका-यांचे सदैव ऋणी आहेतज्‍यांनी वेळेवर योग्‍य निर्णय घेऊन मला या हॉस्पिटलमध्‍ये आणलेअसे  किरण जाधव (रूग्‍ण) म्‍हणाले. 


Post a Comment

0 Comments