चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या किलबिल नर्सरी चा उद्घाटन सोहळा संपन्न


चिंचपोकळी  :-  चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ संचालित किलबिल नर्सरी या वास्तूचे नूतनीकरणाचे काम खासदार सन्मा.श्री. अनिलभाऊ देसाई  यांच्या सहकार्याने करण्यात आले. या वास्तूचे उदघाटन शनिवार दि.२७ /११/२०२१ रोजी सायं.६ वा. खासदार सन्मा. श्री.अनिलभाऊ देसाई,शिवसेना सचिव यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गिरणगावातील बच्चेकंपनीला या माफक दरातील नर्सरी चा नक्कीच लाभ होईल. त्यामुळे पालकांनी या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. 


           या कार्यक्रमाच्या वेळी नगरसेवक अनिल कोकिळ, नगरसेवक रमाकांत रहाटे,नगरसेविका सिंधूताई मसुरकर, सुनिल (बाळा) कदम,सिनेट सदस्य युवासेनेचे निखिल यशवंत जाधव,विधानसभा संघटक विजय (दाऊ) लिपारे, शाखाप्रमुख हेमंत कदम, स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ न्यु इंडिया अॅशुरन्स  सरचिटणीस दिनेश बोभाटे, महिला शाखा संघटक भारती पेडणेकर,चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचे अध्यक्ष उमेश नाईक, मानदसचिव वासुदेव सावंत, कोषाध्यक्ष अतुल केरकर, बाळाशेठ कोपडे, लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे,शेखर पांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. 


        या शुभारंभ प्रसंगी महाराष्ट्राची कन्या रोप मल्लखांब पट्टू हिमानी परब हिस नुकताच भारताचे राष्ट्रपती यांच्या हस्ते अर्जून पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते त्यानिमित्ताने तिचा सत्कार मंडळाच्या वतीने करण्यात आला. चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाने कोरोना काळात हे वर्ष जनआरोग्य वर्ष म्हणून घोषित केले असून यासाठी रुग्ण साहित्य उपलब्ध करून दिलेले असून त्याचा रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन मंडळाचे मानद सचिव श्री वासुदेव सावंत यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments