हिरकणी सायकल क्लबची भरारी सायकल चालवित हिरकणी महिला सदस्या देतात पर्यावरण संदेश, आरोग्य फिटनेस मंत्र

               


कल्याण , प्रतिनिधी : कल्याण डोंबिवली मनपाक्षेत्रातीत हिरकणी प्रतिष्ठानच्या माध्यमातून १६० विविध वयोगटातील, शिक्षितउच्च शिक्षित सर्व साधरण १६० महिलांनी एकत्र येत हिरकणी सायकल क्लब ग्रुप तयार केला आहे. घरातील तसेच कामावर जात असलेल्या महिला आपल्या कामाच्या जाबाबदार्या सभांळत एकत्र येत सायकलिंग करीत उत्तम आरोग्यासाठी कल्याण डोंबिवली तील १६० हिरकणीनी व्यायामाचा वसा घेतला आहे

.

डोंबिवलीतील रहिवाशी सामाजिक कार्याची आवड जोपसत तळागाळातील महिलांच्या मदतीला धावणाऱ्या १२वी पर्यंत शिक्षण घेतलेल्या ५५वर्षीय  सुलेखा गटकळ यांनी सामाजिक बांधलीकीतुन अनेक सेवाभावी उपक्रम राबविले आहेत. एनजीओच्या माध्यमातून समाजासाठी त्या कार्यरत असुन "स्किनो फिजीया" फाऊंडेशन माध्यमातून मानसिक रुग्णांना आधार देण्यासाठी मानस उपचार तज्ञ डाँक्टर राहुल घाडगे यांच्या कडुन मोफत सल्ला देण्याचे कार्यकोरोनाकाळात दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असणाऱ्या अन्न धान्य देत त्यांनी दिलासा दिला. यंदा दिवाळी निमित्त महिलांना एकत्र करून दिवाळी फराळ विक्रीतुन पाच लाखाहुन अधिक रूपायांची उलाढाल करून महिलांना रोजगार दिला.


सप्टेंबर मध्ये त्यांनी हिरकणी प्रतिष्ठानच्या माध्यमातून हिरकणी सायकलिंग क्लबची स्थापना केली. यामध्ये १६० महिलांना एकत्र करून मनपाच्या ह.भ.प सावाळाराम महाराज क्रिडा संकुल येथे रोज सकाळ संध्याकाळ सायकलिंगचा सराव करीत आपल्या आरोग्याच्या प्रश्नाबाबत जागरूक करीत सायकलिंग व्यायामाचे धडे गिरवले. विरूगुंळ्या बरोबर त्या महिलांचा उत्साह आनंद  द्विगुणित होण्यासाठी सायकलिंग सरावाचा छंद लागला  आहे.         

                 

"क्रांती दिवाकर या डोंबिवलीत रहिवाशी असुन आरोग्य विभागातुन सेवानिवृत्त झालेल्या आहेत. वयाच्या ६७ वर्षी ही हिरकणी सायकल क्लबच्या माध्यमातून जोडल्या गेल्या असुन गेल्या दोन महिन्यापासून नित्यनेमाने सायकल चालविण्याचा सराव करून आपल्या शालेय जीवनातील, काँलेज जीवनातील सायकल चालविण्याचा छंद हा गतकाळात जोपासू शकल्याची खंत होती. ती आता रोज सायकल चालविण्याने दूर झाल्याचे त्यांनी सांगितले." 

 

      "तळागाळातील महिलांना आजच्या महागाईच्या काळात महागड्या सायकल खरेदी करणे शक्य नाही.  सायकलिंग करण्याची इच्छा असुन देखील त्या सहभागी होऊ शकत नाही. यासाठी सेवाभावी संस्थानी  पुढाकार घेण्याची गरज असल्याचे हिरकणी सायकल महिला क्लबच्या सचिव मनिषा सुर्वे यांनी सांगितले."


  "७५व्या भारतीय स्वातंत्र्याच्या महोत्सवी वर्षे निमित्ताने १ डिसेंबर रोजी घरडा सर्कल येथून मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत "सायकल चालवा पार्यावरण वाचवा" इंधन बचतीसाठी सायकल रॅली हिरकणी सायकल महिला क्लबच्या वतीने काढण्यात येणार असल्याचे सुलेखा गटकळ यांनी सांगितले.     


याबाबत मनपा सचिव संजय जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले कीऊंबर्डे येथे मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली अद्यावत असा १ किलोमीटर लांबीचा सायकल ट्रॅक साकारण्यात आला असुन या  सायकल ट्रॅक वर सायकल चालविण्याचा आंनद असंख्य सायकल प्रेमी घेत आहेत. पर्यावरणाच्या दुष्टीकोनातुन सायकलचा वापर झाल्यास पर्यावरणातील वाहनांमुळे होणारे प्रदूषण थांबण्यास मदत होईल. वाहतूककोंडीला आळा बसण्यास मदत होईल. हिरकणी सायकल क्लबच्या महिला सदस्यांना सायकलिंग सुविधा साठी प्रशासन मदतीचा हात देईल."                  

Post a Comment

0 Comments