शिवसेना मध्यवर्ती शाखा आयोजित विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण

          

             


                            

कल्याण , प्रतिनिधी  : शिवसेना मध्यवर्ती शाखा मोहोने आयोजित विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा बुधवारी मोहन्यात उत्साहात संपन्न झाला. शिवसेना मध्यवर्ती शाखा आयोजक रोहन कोटअनील गोवळकर यांनी परिससरातील कलाकारांच्या कलेतील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी घरगुतीसार्वजनिक गणेश दर्शनरांगोळीकिल्ले स्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये प्रथम,  द्वितीयतुतीय क्रमांकांसह उतेजनार्थ बक्षीसाची लायलूट करण्यात आली. या स्पर्धाना लहानांपासून जेष्ठा पर्यंत सर्वाचा चांगला प्रतिसाद लाभला.


या स्पर्धाचा पारितोषिक वितरण समारंभ मोहने येथील शांताराम पाटील शाळेच्या प्रणांगात कल्याण पश्चिम मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर, विधानसभा संघटक अरविंद मोरे, महिला जिल्हा संघटक विजया पोटे, माजी सभागृहनेते रवी पाटीलमाजी नगरसेवक दुर्योधन पाटीलविघाधर भोईरमोहन उगलेकल्याण उपशहर प्रमुख विजय काटकरसुरेश सोनार, अंकुश जोगदंड, भुषण तायडेकल्याण तालुका ग्राहक सरंक्षण कक्ष प्रमुख विजय देशेकर, योगेश पाटील, रमण तरे, जेष्ठ शिवसैनिक गंगाराम गाडे, शिवसेना महिला आघाडी अस्मिता गोवळकरशालिनी गाडे, युवासेना शहर अधिकारी मोहोने -टिटवाळा दिनेश निकम व सर्व शिवसैनिकयुवसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित होते.


घरगुती गणेश स्पर्धेत प्रथम क्रंमाकाचे पारितोषिक करोना साजवटीसाठी वुषाली नायकोडी यांनी प्राप्त केले. सार्वजनिक गणेश दर्शन स्पर्धेत प्रथम क्रंमाक पारितोषिक विजेते नवतरुण मित्र मंडळ विठ्ठलवाडी यांनी पटकविले. रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रंमाक पर्यावरण संदेश रांगोळी साठी पल्लवी जाधव यांना देण्यात आले. ऐतिहासिक वारसा असलेल्या गड किल्यांचा इतिहास भावी पिढीवर कायम स्वरुपी बिंबविण्यासाठी घेतलेल्या किल्ले स्पर्धेत प्रथम क्रंमाक एच एन बॉईज यांनी  हुबेहूब साकरलेल्या किल्ले रायगड प्रतिकुतीने प्राप्त केला.


याप्रसंगी आमदार विश्वनाथ भोईर यांनी शिवसेना ही तळागाळातील लोकांसह समाजातील सर्वच स्तरातील वर्गाच्या सुख दुखात धाव घेत मदतीसाठी धाव घेते. त्यामुळे जनसामान्यापर्यत थेट संपर्कात शिवसेना आहे असे प्रतिपादन केले. पारितोषिक प्राप्त चिमुकल्याचा आनंद त्यांच्या प्रफुल्लित चेहऱ्यावर यानिमित्ताने दिसून येत होता. पाटील बालमंदिर येथे लागलेल्या आगीत धाडसाने जाऊन ज्याने सर्वात आधी आग आटोक्यात आणली तो युवासैनिक चेतन बळुरगी याचा आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते विशेष गौरव  करण्यात आला.


कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनिल गोवळकर यांनी केले. क्रार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी प्रमुख आयोजक रोहन कोट, परीक्षक चित्रकार राजेश पवार, अनिल गोवळकरविजय काटकर, संजय शेळकेरवि उल्हारे, राम येरम, मच्छिन्द्रनाथ डवचे, चेतन बळुरगी, चेतन कांबरेबंटी येरमस्वप्नील यांनी विशेष परीश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments