कल्याण एसटी डेपो बाहेर खाजगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची आर्थिक लूटमार तेजीत


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : सर्वसामान्य जनतेच्या प्रवाशांना परवडणारी "लालपरीची" सेवा  राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या संपामुळे ठप्प पडल्याने खाजगी प्रवासी वाहतूकदारांनी संधीचा फायदा उठवित कल्याण डेपो बाहेर प्रवाशांना इच्छित स्थळी प्रवास करण्यासाठी अव्वाचा सव्वा भाडे आकारत असल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत असल्याचा प्रकार गेल्या काही दिवसांपासून घडत आहे.


कल्याणातून प्रवाशांची खासगी वाहतूक करणारे वाहतुकीच्या नियमांना बगल देत आपल्या वाहनांमध्ये भरभरून प्रवाशी कोंबत आहेत. यामुळे प्रवाशांचा जीव टांगणीला बांधला गेला आहे. खासगी ट्रॅव्हल्स कंपन्याकाळी पिवळीइकोवडाप या सर्वांच्या अतिक्रमणानंतरही राज्य परिवहन महामंडळ अर्थात लालपरी टिकून राहिली. आजही ग्रामीण भागातील ५० टक्के पेक्षा जास्त प्रवासी एसटीवर अवलंबून राहात आहेत. 


कल्याण नगरकल्याण कोल्हापूर, कल्याण नाशिककल्याण दापोलीगुहागरचिपळूण आदी मार्ग एसटीसाठी हक्काचे उत्पन्नाचे स्त्रोत आहेत. गणपती व आषाढी एकादशी या काळात कल्याण आगाराला लाखोंचे उत्पन्न मिळवून देत कोकण विभागात कल्याण आगार टॉप राहिले आहे.


 जवळजवळ २०० च्या आसपास बसने होणारी प्रवाशी वाहतूक सेवा डेपोतील संपामुळे ठप्प  झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल सुरू झाले. खासगी वाहने चालविणार्‍या चालकांनी प्रवाशांना इच्छित स्थळी पोहोचविण्यासाठी जास्त पैसे घेण्याची लूटमार सुरू ठेवत प्रवाशांना वाहनांमध्ये बकर्‍यांसारखे कोंबत वाहतूक सुरू ठेवली आहे. कल्याण आगाराच्या बाहेर प्रवाशांची लुटमार करणार्‍यांची टोळी सक्रिय झाली असून आवाज देऊन इच्छित स्थळी पोहोचविण्याची ऑफर देऊ लागले आहे. यामध्ये दलालही सक्रीय झाल्याचे दिसून येत आहे.


 खासगी वाहतूक प्रवास करणाऱ्या या वाहतूकदारांकडे वाहनाचे परमिटपीयूसीइन्शुरन्स नसल्याचे बोलले जात असून वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून पोलिसांच्या मेहेरबानीने कल्याण डेपोच्या बाहेर प्रकार घडत आहे. वाहतूक पोलीस सर्व प्रकार उघड्या डोळ्यांनी बघत असून कारवाई होत नसल्याने कोरोना पार्श्वभूमीच्या संकटाकाळानंतर सावरत असलेल्या सर्वसामान्य  प्रवासी वर्गाला  खाजगी वाहतूक सेवेच्या अव्वाच्या सावा भाडे आकरणीचा फटका आर्थिक दृष्ट्या बसत असल्याचे चित्र या निमित्ताने दिसत आहे.

Post a Comment

0 Comments