एसटी कामगारांचा प्रश्न शरद पवारांच्या मध्यस्थीने सुटला , राजकीय विरोधक डोकी भडकवतात ... जितेंद्र आव्हाड

■भिवंडीत राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय उदघाटन प्रसंगी प्रचंड गर्दी , कोरोना नियमांची ऐशीतैशी..


भिवंडी दि 27 (प्रतिनिधी ) राष्ट्रवादी काँग्रेस भिवंडी शहर जिल्हा अध्यक्षपदी शोएब खान गुड्डू यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी पक्ष कार्यालयाची उभारणी केली . त्याच्या उद्घाटनप्रसंगी सायंकाळी उशिरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे भिवंडी शहरात आले असता भिवंडीत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले रांजनोली नाका ते कार्यालय येथपर्यंत मोठी बाईक रॅली काढून त्यांची जंगी मिरवणूक काढण्यात आली या रॅलीमध्ये शेकडो बाईक सहभागी झाल्या होत्या तर कार्यक्रम स्थळ कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली कोरोना नियंत्रणात आला असला तरीही  शासकीय जे नियम कोरोना संसर्गा बाबत घालून दिले आहेत त्या नियमांची पायमल्ली कार्यकर्त्या कडून या ठिकाणी करण्यात आली.


          या कार्यक्रम प्रसंगी पत्रकारांशी बोलताना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एसटी आंदोलना वरून एक ट्विट करीत कामगार उपाशी नेते तुपाशी अशी बोचरी टीका केली होती त्यावर बोलताना एस टी कामगारांच्या सुरू असलेल्या आंदोलना वर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केल्याचे नमूद केले.भाजपाच्या नेत्याने शरद पवार का मध्ये पडतात त्यांच्या घरी का बैठका होतात यास आपण या ट्विट च्या माध्यमातून उत्तर दिल्याचे सांगितले .


           गेल्या 40 वर्षांपासून एसटी कर्मचार्‍यांच्या जेव्हा जेव्हा अडचणी निर्माण झाल्या तेव्हा तेव्हा त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी शरद पवार यांनी प्रयत्न केले तसेच ऊसतोड कामगारांचा संप झाला त्यावेळी गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगारांच्या मागण्या घेऊन पवार साहेबांकडे यायचे व पवार साहेब त्यांचे प्रश्नदेखील मिटवायचे तसेच बिडी कामगारांचा संप झाला त्यावेळी देखील नर्सय्या आडम व शरद पवार  बसून प्रश्न सोडयचे. 


         परंतु उगाचच काही नेत्यांनी शरद पवारांवर आक्षेप घेतला आणि त्यामुळे मी त्यांच्या विरोधात बोललो काही राजकीय पक्षांनी एसटी कर्मचाऱ्यांना हाताशी धरून महाराष्ट्राला वेठीस धरण्याचे काम केलं तसेच एसटी कर्मचाऱ्यांचे जवळपास सगळ्या मागण्या पूर्ण झाल्या असून फक्त विलीनीकरणा च्या प्रश्नावर चर्चा सुरू आहे मात्र काही राजकीय नेते एसटी कर्मचाऱ्यांचे फसवणूक करतात परंतु फसवणूक करणारे हे नेते कोण आहेत त्याचं त्यांचं नाव न घेता आव्हाड यांनी भाजपला टोला हाणला आहे.

Post a Comment

0 Comments