भिवंडी पश्चिमचे आमदार महेश चौघुले यांच्या निधीतून रुग्णवाहिका व शववाहिकेचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

 भिवंडी दि 18(प्रतिनिधी ) भिवंडी पश्चिम विधानसभेचे आमदार महेश चौघुले यांच्या स्थानिक विकास निधीतून एक रुग्णवाहिका व शववाहिकेचे लोकार्पण विधान सभा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते मुंबई येथे करण्यात आले .याप्रसंगी विधान परिषद विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर,माजीमंत्री रवींद्र चव्हाण ,आमदार महेश चौघुले ,भिवंडी भाजपा शहराध्यक्ष संतोष शेट्टी ,नगरसेवक शाम अग्रवाल ,अँड हर्षल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.


          तर देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक विकास निधीचा विनियोग सर्वसामान्य जनतेला करून दिल्या बद्दल आमदार महेश चौघुले यांचे अभिनंदन केले तर आमदार महेश चौघुले यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेली रूग्णवाहिका स्व इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयास देण्यात येणार असून स्वर्गरथ म्हणून उपलब्ध झालेली शववाहिका ही भिवंडी महानगरपालिके कडे सुपूर्द करण्यात येणार असून शहरातील नागरीकांना अंत्यसंस्कारासाठी मृतदेह स्मशानभूमीत घेऊन जाणे सोयीस्कर होणार असल्याची माहिती देत   लवकरच एक अत्याधुनिक यंत्रणेने सुसज्ज कार्डिक रुग्णवाहिका शहर वासीयांच्या सेवेत दाखल होणार असल्याचे  आमदार महेश चौघुले यांनी सांगितले

Post a Comment

0 Comments