देशसेवा करणाऱ्या वीरांचा सन्मान

 कल्याण, कुणाल म्हात्रे  :  26/11 च्या अतिरेकी हल्ल्यातील सूत्रधार अजमल कसाबला जिवंत पकडण्याची अतुलनीय कामगिरी करणारे महाराष्ट्राचे वीर सुपुत्र सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मंगेश नाईक यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमाचे औचित्य साधून शनिवार महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना ठाणे जिल्हा अध्यक्ष उमेश भारती, ठाणे शहर अध्यक्ष निलेश गवांदे, परशुराम पाटील, सर्वेश भुजबळ, योगेश खंडागळे सभासद या मान्यवरांच्या उपस्थित इम्पीरीअल संकुलात सन्मान सोहळा संपन्न झाला. 


जनजागृती प्रतिष्ठान व इम्पीरीअल स्क्वेअर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमात भारताचे शिरोमणी सुभेदार संतोष राळे (किर्ती चक्र), पॅरा कमांडो मधुसूदन सुर्वे (शौर्य चक्र), नायक दीपचंद (कारगील योद्धा) या भारतमातेच्या वीरपुत्रांचाही यथोचित सन्मान करण्यात आला.


Post a Comment

0 Comments