भिवंडीत बालहक्क अधिकार जनजागृती रॅली संपन्न


भिवंडी दि 18(प्रतिनिधी )14 नोव्हेंबर बालदिना नंतर संपूर्ण सप्ताह बालहक्क अभियान जनजागृती म्हणून साजरा केला जात असून त्या अंतर्गत जिल्हा महिला व बाल कल्याण विभाग व भिवंडी महानगरपालिका महिला व बाल कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भिवंडी शहरातील जिल्हा बाल परिवेक्षण गृह येथून पालिका मुख्यालय दरम्यान रॅली काढून जनजागृती करण्यात आली .


            रॅलीच्या प्रारंभी भिवंडी न्यायालयाच्या न्यायधीश कावळे , बाल परिवेक्षण गृहाचे मानद सचिव दिलीप कलंत्री यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीस शुभारंभ झाला या प्रसंगी जिल्हा सुरक्षा अधिकारी बालकृष्णन रेड्डी ,
पालिका उपायुक्त नूतन खाडे, श्री साई सेवा संस्थेच्या अध्यक्षा डॉ स्वाती खान सिंग उपस्थित होते .
या रॅलीत परिवेक्षण गृहातील मुलींसह रेड लाईट एरिया व प्लॅटफॉर्म वरील बेघर मुलांचा समावेश होता .


        त्यांनी बाल मजुरी ,बालकांचे शिक्षण या साठी जोरदार घोषणाबाजी केली .महानगरपालिका मुख्यालयात या चिमुकल्यांचे महापौर प्रतिभा विलास पाटील ,आयुक्त सुधाकर देशमुख यांनी स्वागत करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Post a Comment

0 Comments