कल्याण , कुणाल म्हात्रे : एका इमारतीच्या घरातील बेडरूममध्ये कोब्रा नाग भक्ष्याच्या मागोमाग शिरला होता. त्यानंतर कोब्रा नागाने भक्ष्याची शिकार करून त्याला फस्त केल्याने तो बेडरूममध्ये सुस्त झाला. मात्र कोब्रा नागाला पाहून त्या घरातील कुटूंबाची झोपच उडाली होती. हि घटना कल्याण पश्चिमेकडील असलेल्या राधानगर संकुलमधील एका इमारतीत घडली आहे.
नवीन कल्याण म्हणून ओळख निर्माण झालेल्या पश्चिमेकडील परिसरात मोठमोठी गृह संकुले जंगल, शेती नष्ट करून उभारली जात आहे. त्यातच गेल्या ६ दिवसापासून अचानक वातावरण बदल्याने बिळातून विषारी – बिनविषारी साप भक्ष्य शोधण्यासाठी व थंडी पासून बचावासाठी मानवी वस्तीत शिरत असल्याच्या घटना घडत असतानाच कल्याण पश्चिम मधील राधानगर संकुल येथील एका इमारतीध्ये विशाल शिंदे कुटूंबासह तळ मजल्यावर राहतात.
त्यातच सायंकाळच्या सुमारास शिंदे यांची मुलगी घरातील वाशिंग मशीन शेजारी अभ्यास करण्यासाठी बसली होती. मात्र कोब्रा नाग भक्ष्याच्या मागावर असल्याचे तिला मशीन खाली दिसल्याने तिने नागाला बघताच घरातून पळ काढला. आणि घरात नाग शिरल्याची माहिती घरच्यांना दिल्याने त्यांची झोपच उडाली होती.
काही वेळातच कोब्रा नाग बेडरूममध्ये भक्ष्याच्या मागोमाग शिरला होता. तर घरात नाग शिरल्याची माहिती विशाल शिंदे यांनी सर्पमित्र हितेश यांना दिली. सर्पमित्र हितेश घटनस्थळी येऊन कोब्रा नागाला पकडून पिशवीत बंद केल्याने शिंदे कुटुंबाने सुटकेचा निश्वास घेतला. हा साप इंडियन कोब्रा जातीचा असून ३ फूट लांबीचा आहे. या जातीचे साप खूपच विषारी असल्याची माहिती सर्पमित्राने दिली.
0 Comments