मतदार नोंदणीसाठी आयुक्तांनी स्वत:च्या आवाजात गायले गाणे


कल्याण : मतदान हे राष्‍ट्रीय कर्तव्य असून मतदानाच्या मुलभूत हक्कापासून मतदार राजा वंचित राहू नये म्हणून निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात मतदार नोंदणी अभियान सुरु आहे.               या अभियानाला अधिक चालना देण्यासाठी महापालिकेच्या माहिती व  जनसंपर्क विभागामार्फत नियोजनबध्द्व केलेलीदत्तात्रय लदवा  लिखित, " चला चला..... मतदार नोंदणीला " या आशयाचे गीत(गाणे) स्वत:च्या आवाजात गाऊन महापालिका आयुक्तांनी मतदान नोंदणीचे कामात नवचैतन्य जागविले आहे.मतदार नोंदणी अभियानात सहभागी होऊन दि.३० नोव्हेंबर पर्यंत आपला मतदार नोंदणी अर्ज सादर करुन मतदानाचा हक्क‍ अबाधित राहण्यासाठी मतदान नोंदणी अभियानाला प्रतिसाद देण्याचे आवाहन महापालिका आयुक्तांनी या गीतातून केले आहे.


Post a Comment

0 Comments