कल्याण पूर्वेत “संविधान दिन सन्मान सोहळ्याचे” आयोजन


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : २६ नोव्हेंबर १९४९ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला महान संविधान समर्पित केले होते. जगातील सर्वश्रेष्ठ समजल्या जाणाऱ्या भारतीय राज्यघटनेचे महत्त्व अधोरेखित करणारा संविधान दिवसानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर लोक हित-वर्धक संघविश्वभुषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीडॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरीनिर्वाण दिन अभिवादन समिती व कल्याण पूर्व माता रमाई जयंती महोत्सव समिती यांच्या वतीने २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन सन्मान सोहळ्याचे” आयोजन शुक्रवारी कल्याण पूर्वेतील ड प्रभागक्षेत्र कार्यालय येथे करण्यात आले आहे.


जेष्ठ पत्रकार महेश म्हात्रे यांच्या व्याख्यानाचे यावेळी आयोजन करण्यात आले आहे. भारताचे संविधान हक्क आणि कर्तव्ये” या विषयांवर जाहीर व्याख्यान व प्रबोधनात्मक पोवाड्याचे या वेळी सादरीकरण होणार आहे. भारत सरकार पुरस्कार विजेते व सुप्रसिद्ध अष्टपैलु युवा लोककलावंत शिवपाईक योगेश चिकटगावकर यांची देखील या सोहळ्यास उपस्थिती लाभणार आहे.


 या सोहळ्यास उपस्थित राहून भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान दिनानिमित्त नमन करून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती आयोजकांनी केली आहे.


Post a Comment

0 Comments