दिवाळी निमित्त ट्रेलची 'स्प्रेडद लाईट' मोहीम
मुंबई, १ नोव्हेंबर २०२१ : भारतातील सर्वात मोठे लाइफस्टाइल सोशल ई-कॉमर्स व्यासपीठ ‘ट्रेल’ दिवाळीचा उत्साह द्विगुणित करून आनंदाची परखण करण्यासाठी सज्ज झाले आहे. ट्रेलने स्प्रेडदलाईट ही अभिनव मोहीम सुरु केली आहे. त्यात १०,००० रुपये मूल्याच्या आकर्षक कुपन्ससह अनेक रोमांचक स्पर्धा आणि रोजचीही कुपन्स असतीलच. यासोबतच, या स्पर्धेत अत्यंत समरसून भाग घेतलेल्या तथा सर्वाधिक सहभाग नोंदवलेल्या टॉप ३ स्पर्धकांना ट्रेलकडून गेस, स्वीसब्रँड आणि इतर प्रख्यात ब्रँड्सकडून जॅकपॉट हॅम्पर्स देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. ही मोहीम ४ नोव्हेंबर २०२१ पर्यंत चालणार आहे.


      स्प्रेडदलाईटच्या माध्यमातून ट्रेल आपल्या युजर्सना मौजमस्ती, खाद्यपदार्थ आणि फॅशनबाबत सर्वकाही असलेल्या ट्रेल दिवाळीत सहभागी होण्याचे निमंत्रण देत आहे. या दिवसांत दिवाळसणाच्या विविध तत्त्वांचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यात व्हर्च्युअल रांगोळी, ट्रेल (तीन) पत्ती, लाइव्ह वॉच अँड विन स्पर्धा आणि ट्रेलवरील प्रख्यात क्रिएटर्स व फॉलोअर्सचे एक स्नेहमिलनही होणार आहे. स्प्रेडदलाईट मोहीमेत भाग घेऊन आपले फेस्टिव्ह लूक्स, डीआयवाय, प्रेरक भाषणे, खाद्यपदार्थांच्या पाककृती, गृहसजावट आणि इतर श्रेणींमध्ये योगदान देत लोकांना उत्तम लाइफस्टाइल पर्याय निवडण्यासाठी मदत करणाऱ्यांना ट्रेल आपले व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे.


       ट्रेलचे संस्थापक आणि सीईओ पुलकित अग्रवाल म्हणाले की, “भारताचे समृद्ध सांस्कृतिक वैविध्याचे प्रदर्शन आणि त्याचा उत्सव साजरा करण्याबाबत ट्रेल सर्वात अग्रस्थानी आहे. यंदा आमच्या ऑनलाइन सोहळ्यांसह आपल्या देशातील वैविध्यपूर्ण परंपरा जिवंत करण्यासोबतच एकात्मतेच्या भावनेला चालना देण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत. आयुष्याच्या विविध क्षेत्रांतून जास्तीत जास्त भारतीयांचे माहितीपूर्ण आणि अर्थपूर्ण कंटेंट आणि रोमांचक स्पर्धांसह मनोरंजन करत त्यांच्या प्रियजनांसोबत घरीदारी तितक्याच उत्साहाने सण साजरा करण्यासाठी स्वागत करता यावे, ही यामागील प्रमुख कल्पना आहे.”

Post a Comment

0 Comments