केडीएमसीच्या ई प्रभागात रस्त्यावरील अतिक्रमणांवर निष्कासनाची कारवाई


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  महापालिका  क्षेत्रातील रस्त्यावरील वाहतूकीची कोंडी कमी व्हावी आणि लोकांना प्रवास करणे सुलभ व्हावे या दृष्टीकोनातून महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यापूर्वीच दिलेल्या  निर्देशानुसार ई प्रभागाचे सहा. आयुक्त आणि त्यांच्या अतिक्रमण निर्मुलन विभागाचे कर्मचारी यांनी महापालिका पोलीस व वाहतूक शाखेचे कर्मचारी यांच्या मदतीने ई प्रभागक्षेत्रांतर्गत कल्याण शिळ रोड ते अनंतम रिजन्सी या रस्त्यालगत असलेल्या गॅरेजवाल्यांवर कारवाई करत १२ गाळयांचे पक्के जोते६७ मंडप शेड तसेच रस्त्यावरील ८ टप-यांवर निष्कासनाची  धडक कारवाई केली.


             त्याचप्रमाणे रस्त्यावर उभ्या असलेल्या ५ चार चाकी गाडया,  २ टेम्पो व ५ मोटार सायकल अशी एकुण १२ बेवारस वाहने उचलून खंबाळपाडा येथील वाहन तळावर जमा केली.

Post a Comment

0 Comments