टेक मोबिलिटी स्टार्टअप ‘ऑटोमोविल’चा पुण्यात विस्तार


■शहरात ३ कंपनीच्या मालकीचे हब्ज आणि २० भागीदारीकृत कार्यशाळांची भर ~


मुंबई, ११ नोव्हेंबर २०२१ : ऑटोमोविल या एक फुल-स्टॅक मोबिलिटी स्टार्टअपने, पुण्यात आपले ऑपरेशन सुरू केले आहे. या ब्रँडने २० कार दुरुस्ती कार्यशाळांसह भागीदारी केली आहे आणि शहरात विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात कंपनीच्या मालकीचे 3 हब्ज स्थापन केले आहेत. हे नवीन लाँच, ब्रँडच्या नुकत्याच घोषित केलेल्या वेस्ट इंडिया एक्पॅन्शन धोरणाशी सुसंगत आहे. या लॉन्चसह, ऑटोमोव्हिलने १६ हून अधिक शहरांमध्ये म्हणजे बेंगळुरू, हैदराबाद, गुरुग्राम, फरिदाबाद, नोएडा, गाझियाबाद, गुवाहाटी, हैदराबाद, पटना, अहमदाबाद, लखनौ, चेन्नई, जयपूर, मुंबई, पुणे आणि कलकत्तामध्ये आपली किरकोळ क्षेत्रातील उपस्थिती मजबूत केली आहे.


     ऑटोमोविलचे सह-संस्थापक आणि सीबीओ, श्री. रमण सांबू, ब्रँडच्या विस्ताराबाबत म्हणाले, “वाहन मालकीच्या बाबतीत, पुणे हे भारतातील ७ वे आणि महाराष्ट्रातील दुसरे मोठे शहर आहे. शहरातील संभाव्य ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्हाला एक भव्य संधी दिसत आहे. देशभरात १० हून अधिक हब्ज यशस्वीरीत्या कार्यरत असण्याचा अनुभव आमच्याकडे असल्याने, आम्ही पुण्याच्या ग्राहकांना त्रासमुक्त, सोयीस्कर आणि पारदर्शक किफायतशीर सेवा पुरविण्याचे वचन देतो. हा ब्रँड सध्या दरमहा ३००० ऑर्डर्स पूर्ण करत आहे, आणि चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस १.५ लाख ऑर्डर्स पूर्ण करण्याची अपेक्षा करत आहे."

 

       ब्रँडने, महामारीनंतरच्या २५०% वाढत्या मागणीला प्रतिसाद म्हणून, अलीकडेच चालू आर्थिक वर्षासाठी त्याची विस्तार योजना पुढे आणली आहे. पश्चिम भारत आणि पूर्व भारतात आपला ठसा रुंदावण्याचे या स्टार्टअपचे उद्दिष्ट आहे. या आर्थिक वर्षातच आणखी ५ शहरांमध्ये ऑपरेशन सुरू करण्याची योजना आहे. ब्रँडने त्याच्या पायलट दरम्यान गेल्या ६ महिन्यांपासून पुण्यातील कार दुरुस्ती सेवा प्रभावीपणे बी2बी ग्राहकांपर्यंत पोहोचवल्या आहेत, त्याशिवाय अंतिम ग्राहकांकडून वाढत्या चौकशीसह बी२सी ऑपरेशन्स देखील सुरू केली आहेत.


       अधिक मोठ्या प्रमाणातील ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी २० भागीदारीकृत कार्यशाळांच्या व्यतिरिक्त, ऑटोमोविलने पुणे शहरातील पिंपरी, कडनगर आणि सौदागर येथे धोरणात्मकदृष्ट्या आपले हब्ज स्थापन केले आहेत. एकट्या ३ हब्जमध्ये दररोज २०० पेक्षा जास्त कार सेवा प्रदान करण्याची एकूण क्षमता आहे.

Post a Comment

0 Comments