डोंबिवलीत काँग्रेसची जोरदार निदर्शने

 डोंबिवली ( शंकर जाधव) अभिनेत्री कंगना राणावत हिने देशाबाबत बेताल वत्यव्य केल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.कल्याण डोंबिवली शहर जिल्हा काँग्रेस कमिटी मानव अधिकार विभाग डोंबिवली शहर जनसंपर्क कार्यालया समोर निदर्शने करण्यात आली.यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्याना ताब्यात घेऊन सोडून दिले. 


       कल्याण जिल्हा अध्यक्ष राजकुमार हिरावत, ज्येष्ठ कार्यकर्ते पॉली जेकब, शहर अध्यक्ष संजय पाटील  उपाध्यक्ष राजू सोनी , सुनील चव्हाण , निशिकांत रानडे, विनोद पिल्ले यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.  आंदोलनापूर्वी पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना १४९ कलमानव्ये अटकेची नोटीस बजावली होती. त्रिपुरा राज्यात घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने सदर राज्यात काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. तरी आपण दिलेला जनआदोंलनाचा अर्ज नाकारण्यात येत असल्याचे नोटीसमध्ये म्हटले आहे.


         आपल्या ताब्यात घेतले जाईल याची भीती न बाळगता काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.कंगना राणावतला दिलेला पदश्री पुरस्कार सरकारने परत करावा,तिच्यावर गुन्हा दाखल करून अटक करा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली.दरम्यान डोंबिवलीत काँग्रेस पक्षातील अनेक पदाधिकारी व वरिष्ठ नेते असुनही त्यांनी आंदोलन का केले नाही, मानव अधिकार विभागाने केलेल्या आंदोलनात हे पदाधिकारी व नेते का सहभागी झाले नाही असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.

Post a Comment

0 Comments