शाळा व्यवस्थापकाच्या कुटुंबियांवर प्राण घातक हल्ल्या तील काही आारेपी अजूनही मोकाट

■जीवाला धोका असल्याने कुटुंबियांची न्यायासाठी मागणी..


कल्याण, कुणाल  म्हात्रे  :  कल्याणमधील शाळा व्यवस्थाकाच्या कुटुंबियांवर झालेल्या हल्ल्या प्रकरणी आत्तार्पयत आठ आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात अजूनही काही आरोपी अटक होणे बाकी आहेत. त्यामुळे आमच्या जिवितास धोका आहे. पोलिसानी दोन पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्हया प्रकरणी सखोल चौकशी करावी आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी व्यवस्थापकाने केली आहे.


कल्याण पश्चिमेत राहणारे गिरी सोमय्याजुला हे खडकपाडा परिसरातून त्यांच्या कुटुंबासह चार चाकी गाडीतून जात असताना १४ ऑक्टोबर रोजी पाच जणांनी त्यांच्या गाडीवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. सीसीटीव्हीच्या सहाय्याने खडकपाडा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. यात धक्कादायक माहिती समोर आली. 


शाळेच्या मालकी हक्काच्या वादातून गिरी यांच्यावर हल्ला करण्यासाठी सुपारी देण्यात आली होती.  या प्रकरणी खडकापाडा पोलिसांनी अथक प्रयास करुन आठ आरोपींना गजाआड केले. यातील शाळेतील कर्मचारी जयेश अंकुश याचासुद्धा समावेश होता. या प्रकरणात एक महिला आरोपी आहे. तिच्या जामीनाचा अर्ज न्यायप्रविष्ट आहे.


मात्र गिरी आणि त्यांच्या कुटुंबियांनी या प्रकरणात नवी खुलासा करीत आरोपी केला आहे. त्यांच्यावर पाळत ठेवली जात असून काही जणांकडून धमकाविले देखील जात आहे. अजूनही काही जण आहेत. जे या कटात सामिल होते. ते मोकाटच आहेत. फेब्रुवारी महिन्यात यामध्ये एक केस झाली होती. 


या प्रकरणात कोळसेवाडी पोलिसांनी गांभीर्य दाखविले नाही. त्यानंतर आरोपींची हिंमत वाढली गेली. नंतर ऑक्टोबरमध्ये आमच्या हल्ला झाला. या दोन्ही प्रकरणी ठोस करावाई करण्यात यावी. लवकरात लवकर पोलिसांनी अन्य आरोपींना अटक करावे अशी मागणी केली आहे.

Post a Comment

0 Comments