वझीरएक्सने भारताचा पहिला क्रिप्टो एक्स्चेंज ट्रान्स्परन्सी रिपोर्ट सादर केला
मुंबई, १२ नोव्हेंबर २०२१ : वझीरएक्सने गुंतवणूकदारांच्या सुरक्षेप्रती आपली बांधिलकी सातत्याने जपली आहे. अनेक मार्गांनी त्यांच्या हिताची जपणूक करत या मंचाने त्यांच्या ऋणांची परतफेड केली आहे. यूजर्सना वझीरएक्सची कार्यपद्धती, मंच वापरण्यासाठीच्या प्रमाण अटी व शर्थी तसेच गोपनीयता धोरण अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता यावे या हेतूने १ एप्रिल २०२१ ते ३० सप्टेंबर २०२१ या कालावधीसाठीचा ट्रान्स्परन्सी रिपोर्ट अर्थात पारदर्शकता अहवाल वझीरएक्सने प्रकाशित केला आहे.


      वझीरएक्सने यूजर्सचा डेटा आणि त्यांची आर्थिक माहिती सुरक्षित राखण्यासाठी अतिशय काळजीपूर्वक आपली धोरणे आखली आहेत. आमच्या ट्रान्स्परन्सी रिपोर्टमध्ये कायद्याची अंमलबजावणी करणा-या यंत्रणांकडून (लॉ एन्फोर्समेंट एजन्सीज-एलईए) कडून मागविण्यात आलेली माहिती, या माहितीचे स्वरूप, यूजर्सच्या पडताळणीची प्रक्रिया आणि ग्राहकांच्या मदतीसाठीच्या तरतुदींपर्यंत सर्व मुद्दयांचा समावेश करण्यात आला आहे. माहितीसाठी अर्ज करताना लॉ एन्फोर्समेंट एजन्सीसबरोबर समन्वय साधताना संबंधित एजन्सीने मागविलेली माहिती मिळविण्याचा हक्क त्या एजन्सीला असावा यासाठी आम्ही प्रत्येक अर्जप्रमाणित करतो.


अहवालातील ठळक मुद्दे:


● एप्रिल २०२१ ते सप्टेंबर २०२१ यादरम्यान वझीरएक्सकडे एलईएकडून ३७७ विनंतीअर्ज आले, ज्यापैकी ३८ अर्ज हे परदेशी कायदे अंमलबजावणी यंत्रणांकडून आलेले होते.


● मागविण्यात आलेल्या सर्व कायदेशीर माहितीचे स्वरूप हे गुन्हेगारी होते व ३७७ हून अधिक संख्येने आलेल्या या पृच्छांना आम्ही १०० टक्‍के प्रतिसाद दिला आहे.


● एप्रिल ते सप्टेंबर २०२१ या कालावधीमध्ये १४,४६९ खात्यांना टाळे लावण्यात आले आहे. या खात्यांपैकी ९० टक्‍के खात्यांवरील कारवाई यूजर्सच्या इच्छेने करण्यात आली. (ग्राहकांनी खाते बंद करण्यासाठी केलेल्या विनंतीनुसार) आणि १० टक्के खात्यांवरील कारवाई आमच्या लीगल टीमने केली. पेमेंट्स चुकती करण्यासंदर्भातील विविद किंवा एलईएद्वारे चालविल्या जाणा-या खटल्यांचा तपास सुरू असल्यामुळे लीगल टीमला या खात्यांना टाळे लावावे लागले.


“टान्स्परन्सी रिपोर्ट आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. अशाप्रकारचे महत्त्वपूर्ण टप्पे गाठले गेल्यानेच भारतामध्ये क्रिप्टो चलनासंदर्भातील नियम तसेच त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन नव्याने घडणार आहे. आमची कामगिरी, बाजारातील भांडवल आणि कामाचे प्रमाण यामुळे अल्पावधीत मोठे आर्थिक यश मिळविणा-या कंपन्यांना दिले जाणारे युनिकॉर्न हे बिरूद बहाल केले गेले आहे. असे असले तरीही स्व-मूल्यमापन हा आमच्या कार्यपद्धतीचा आंतरिक भाग नाही.


        या पार्श्वभूमीवर ट्रान्स्परन्सी रिपोर्टसारख्या उपक्रमांमुळे या परिसंस्थेला अधिक विश्वासार्हता प्राप्त होईल आणि क्रिप्टो चलनातील व्यवहारांकडे बाहेरून बघणा-यांना हे जग अधिक आकर्षक वाटू शकेल. सकारात्मक नियमावलींसारख्या अधिक व्यापक उद्दीष्टांवर आमची नजर आहे आणि नाविन्यपूर्ण पद्धतींचा अंगिकार करत तिथपर्यंत पोहोचण्याचा मार्ग आम्ही काढू.” वझीरएक्सचे सीईओ आणि संस्थापक निश्चल शेट्टी सांगतात.


"हा अहवाल आणि थिंक टँक म्हणजे आमच्या य़ूजर्सना व भारतातील धोरणकर्त्यांना क्रिप्टोसंदर्भातील सर्व व्यवहारांच्या बाबतीत अधिक सुस्पष्ट कल्पना यावी व या व्यवहारांमध्ये पारदर्शकता यावी यासाठीच्या आमच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. कंपनीमध्ये नेमके काय घडत आहे आणि यूजर्सच्या सुरक्षेसाठी आम्ही कोणती पावले उचलत आहेत.


         याविषयी क्रिप्टो चलन वापरणा-या कम्युनिटीला देण्यात येणा-या माहिती मध्ये खुलेपणा असावा यावर ट्रान्स्परन्सी रिपोर्टमध्ये भर देण्यात आला आहे तर वेब ३.० च्या उभारणीच्या प्रक्रियेमध्ये ब्लॉकचेन जगामध्ये चालल्या सर्व प्रमुख घडामोडींची कल्पना करण्यासाठी, त्यांचे विश्लेषण करण्यासाठी व त्यांची नोंद ठेवण्यासाठी बीपी मंचाची निर्मिती करण्यात आली आहे.” पब्लिक पॉलिसी विभागाचे संचालक अरित्रा सरखेल म्हणाले.


          इतकेच नव्हे तर ब्लॉकचेन हे अर्थव्यवस्थेला उभारी देणारे आणि विविध उद्योगक्षेत्रांमध्ये नाविन्यपूर्ण संकल्पनांची नवी पातळी गाठण्याच्या प्रक्रियेला गती देणारे एक प्रमुख आणि चालू व्यवस्थेत अमुलाग्र बदल घडवून आणणाले तंत्रज्ञान असल्यामुळे आम्ही ‘ब्लॉकचैन पेपर्स’ (बीपी) हा भारताच्या काही पहिल्यावहिल्या ब्लॉकचेन संशोधन व विश्लेषण मंचांपैकी एक मंच स्थापन केला आहे. 


         आमच्या कामाची दृश्यमानता वाढविणे आणि आमच्या अनोख्या वैशिष्ट्यांना अधोरेखित करत आपला यूजर बेस विस्तारणे ही त्यामागची संकल्पना आहे. हा मंच विकेंद्रित ब्लॉकचेन परिसंस्थेतील घडामोडी, त्यामुळे प्रभावित होणारी उद्योगक्षेत्रे, व्यापारी कंपन्या आणि जगभरातील अर्थव्यवस्था यांचे सखोल विश्लेषण आणि संशोधन उपलब्ध करून देतो.

Post a Comment

0 Comments