जेष्ठ नागरिक संघातील सदस्यांना वाचनासाठी मोफत दिवाळी अंक सुविधा


■भाजपा कल्याण पूर्व मंडल अध्यक्ष संजय मोरे यांचा अभिनव उपक्रम...

    

कल्याण, प्रतिनिधी  :  कल्याण पूर्वेतील जेष्ठ नागरिकांच्या सोयीसुविधा आपुलकीने जाणुन घेत त्यांना दिलासा देण्यासाठी कल्याण पुर्वेत विविध परिसरात ७ जेष्ठ नागरिक कट्टे साकारत जेष्ठांना आपल्या हक्काचे जागा उपलब्ध करून देणारे कल्याण पूर्व  भाजप अध्यक्षमा.परिवहन समिती सदस्य संजय मोरे यांनी जेष्ठ नागरिक कट्टा संघातील दिवाळी ही गोड व्हावी यासाठी विविध क्रार्यक्रमाचे न्यु रचना  पार्क जेष्ठ नागरिक कट्टा येथे आयोजन केले होते.     


दिवाळी सणानिमित्त जेष्ठ नागरिकांचे आशिर्वाद तसेच त्यांच्याशी हितगुज साधत त्यांच्यासाठी रंगमंच कलाकार शिवाजी शिंदे यांच्या पथकाचे सांस्कृतिक नाट्याचे सादरीकरण तसेचजेष्ठ नागरिकांना दिवाळी अंक वाचनासाठी मोफत उपलब्ध करून देत दिवाळी अंकाचावाचन संस्कृतीचा  वसा सुरू रहावा  व वाचनाची आवड जोपसावी या उद्देशाने संजय मोरे यांनी कल्याण डोंबिवली शहरात जेष्ठ नागरिकांसाठी हा अभिनव स्तुत्य  उपक्रम सुरू करून एक आर्दश पायंडा सामाजासमोर यानिमित्ताने रूजविला आहे.


या प्रसंगी जेष्ठ नागरिकांना दिवाळी फराळभेट वस्तुचे वाटप करण्यात आले. यामुळे जेष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर फुललेले हास्य दिसुन येत होते. या कार्यक्रमाला माजी परिवहन सभापती सुभाष म्हस्केभाजपा महिला जिल्हा उपाध्यक्षा वंदना मोरेउत्तम पवारसंतोष परब, अजय कदम,सचिन कुर्ले तसेच न्यु रचना पार्क जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मनोहर देसाई आणि सदस्य उपस्थित होते.  


जेष्ठांची सेवा करण्यासाठी मी नेहमीच तत्पर असतो. जेष्ठ नागरिकांसाठी मोफत तिर्थाटन सहलीचे आयोजन करतो.  जेष्ठ नागरिकांसाठी शासकीय योजनांची माहिती देत त्यांचा लाभ मिळविण्यासाठी प्रयत्न करणेत्यांच्या सुखा दुखात समरस आपलुकीने चौकशी करीत दिलासा देणे. यंदा दिवाळीनिमित्त जेष्ठ नागरिकांच्या कट्टा साठी वाचनाची आवड कायम राहून मनोरंजनतसेच महिती उपलब्ध होण्यासाठी मोफत दिवाळी अंक जेष्ठ नागरिक संघ कट्यातील सदस्यांसाठी उपलब्ध करून दिले आहेत.


 कैलास नगरकाटेमानेवली नाकाम्हसोबा चौककाटेमानेवली शाळाविजयनगरआर्दश नगर या जेष्ठ नागरिक कट्टा सदस्यांना ही सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती संजय मोरे यांनी दिली. 

Post a Comment

0 Comments