वंचित बहुजन आघाडीची तहसीलदार कार्यालयावर आंदोलन


डोंबिवली ( शंकर जाधव ) वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर व प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांच्या आदेशाने मुस्लिम समाजाच्या न्याय्य हक्कासाठी व संत विचाराचा प्रचार प्रसार करणारे कीर्तनकार ह.भ.प. यांना मासिक वेतन देण्यात यावे या मागणीसाठी  कल्याण डोंबिवली शहर वतीने कल्याण तहसील कार्यालय येथे धरणे आंदोलन करण्यात आले.
 

         या आंदोलनात  कल्याण पश्चिम अध्यक्ष संतोष गायकवाड , डोंबिवली शहर पूर्व अध्यक्ष सुरेंद्र ठोके, डोंबिवली शहर पश्चिम अध्यक्ष गौतम गवई,,  कल्याण तालुका ग्रामीण अध्यक्ष राहुल जाधव ,  ठाणे जिल्हा उपाध्यक्ष जानू मानकर, ठाणे जिल्हा संघटक  सुनील पगारे , महासचिव ज्योतीराम जवळी, राजाभाऊ त्रिभुवन, मिलिंद साळवे, चंद्रकांत पगारे, बबन जाधव, एजाज खान  विलास मोरे, अमोल हिवराळे,संतोष खंदारे, समीर खान आदी पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments