केडीएमसीच्या वतीने सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहिम
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण डोंबिवली महानगरपालिका कार्यक्षेत्रात राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत सक्रिय क्षयरुण शोध मोहिम १५ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर या कालावधीत पहिला टप्या व १३  डिसेंबर ते २३ डिसेंबर या कालावधीत दुसरा टप्पा राबविण्यात येणार आहे.


कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत हे अभियान १८ नागरी आरोग्य केंद्रामार्फत अतिजोखमीच्या २ लाख ५१ हजार ५८२ लोकसंखेचे सर्वेक्षण १३९ टीम द्वारे करण्यात येणार असून यासाठी ३६२ आरोग्य कर्मचारी/स्वयंसेवक करणार आहेत. सन २०२१-२२ मध्ये क्षयरोग नोटीफिकेशन वाढविण्यासाठी क्षयरोग शोध मोहीमेद्वारे जास्तीत जास्त नवीन रुग्ण शोधून उपचाराखाली आणण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आलेले आहे.


भारत सरकारतर्फे सन २००३ पासून राज्यांमध्ये सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येतो. सन २०२५ पर्यंत देश अयमुक्त करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. यासाठी समाजातील प्रत्येक क्षयरुग्ण ओळखून त्यांचा उपचार पूर्ण करणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने क्षयरोग विभागामार्फत गृहभेटीतून क्षयरुग्ण शोधण्यासाठी जोखमीच्या लोकसंख्येमध्ये सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत.


दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकलामुदतीचा तापवजनात घट होणेधुंकोदवारे रक्त पडणे किंवा मानेवर गाठी असल्यास क्षयरोगाच्या अधिक तपासण्या करून निदान निश्चित करण्यात येईल व औषधोपचार चालू केले जातील. आवश्यक त्या सर्व तपासण्या व औषधोपचार मोफत उपलब्ध आहेत. या मोहिमेदवारे समाजातील क्षयरुग्ण शोधणे तसेच या आजाराबद्दल जनजागृती करणे अशी दुहेरी उददीष्टे साध्य होणार आहेत.


आपल्या घरी येणा-या आरोग्य कर्मचारी/ आशा यांना निःसंकोचपणे माहिती देऊन या सकिय क्षयरुग्ण शोध मोहिम  यशस्वी करण्यास सहाय्य करावेअसे आवाहन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत सर्व नागरीकांना करण्यात आले आहे.


Post a Comment

0 Comments