भिवंडीत क्रिकेट क्रीडांगणाचे माजी क्रिकेटपटू गुलाम पारकर यांच्या शुभहस्ते शुभारंभ


भिवंडी दि 20(प्रतिनिधी )गल्लीबोळा पासून सर्वदूर खेळला जाणार क्रिकेट हा सर्वांच्याच आवडीचा खेळ ,परंतु क्रिकेट मधील खरे करीअर हे लेदर चेंडू वरील क्रिकेट मध्ये असताना आज लहान मुलांपासून युवकांचा ओढ टेनिस क्रिकेट खेळण्याकडे अधिक असतो .


           त्यामुळे मुलांमध्ये लेदर क्रिकेट खेळण्याची आवड निर्माण व्हावी , त्या बद्दलचे अद्यावत प्रशिक्षण मिळावे व भिवंडी शहराचे नाव उज्वल करणारे क्रिकेटपटू तयार व्हावेत या साठी पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ संचालित बि एन एन महाविद्यालय क्रीडांगणावर खास खेळपट्टी बनविण्यात आली असून त्याचा शुभारंभ माजी क्रिकेटपटू गुलाम पारकर यांच्या शुभहस्ते संस्थाध्यक्ष विजय जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला .


              लेदर क्रिकेट मध्ये खेळल्यास करीअर बनू शकते त्यासोबत शरीर सुदृढ राहू शकते जे आजच्या युवा पिढीला आवश्यक असल्याने आपण स्वतः ही भिवंडी येथे क्रिकेट प्रशिक्षण करण्यसाठी येणार असल्याचे गुलाम पारकर यांनी स्पष्ट केले .

Post a Comment

0 Comments