डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या प्रश्ना बाबत आयुक्त सकारात्मक

■डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान बचाव समितीने घेतली पालिका आयुक्तांची भेट..


कल्याण , कुणाल म्हात्रे  :  डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या प्रश्ना बाबत पालिका आयुक्त सकारात्मक असून डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान बचाव समितीची पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चाझाली. उद्यानाच्या जागे बाबत आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा कल्याण स्टेशनं समोर बसवण्या बाबत योग्य सहकार्य करण्याचे आयुक्तांनी आश्वासन दिले.


समिती तर्फे पाच महत्वाच्या मागण्या आयुक्तांकडे केल्या. यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचा पूर्णकृती पुतळा लावणेडॉ बाबासाहेब आंबेडकर भवन निर्माण करणे स्मार्ट सिटी अंतर्गत उद्यान शुशोभीत करणे. सर्व मागण्या बाबत आयुक्त यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान बचाव समितीला सहकार्य करण्याचे व त्यांची पूर्तता कारण्याचे आश्वासन दिले. 


तसेच सहाय्यक संचालक नगररचना यांना जमीन मोजून त्याचा अहवाल ठेवण्याचे आदेश दिले. या वेळी समिती आणि आयुक्त यांच्या दरम्यान चर्चे साठी शिष्ट मंडळात अण्णासाहेब रोकडे,बाबा रामटेके,राजू रणदिवे, भारत सोनवणे, संतोष जाधव, कुमार कांबळे, भीमराव डोळस, अक्षय गायकवाड, प्रशांत नगरकर, संजय जाधव आदी जण शिष्ट मंडळात सहभागी होते.

Post a Comment

0 Comments