ओ.बी.सी.समाजाला संपविण्याचे काम भा.ज.पा.करित आहे -- नाना पटोले


■ठाणे काँग्रेस ओ.बी.सी.विभाग अध्यक्षपदि पुनश्च एकदा राहुल पिंगळे...

ठाणे , प्रतिनिधी  :  बहुजन समाज हाच या देशाचा कणा असून भाजप सरकारच्या भुळथापांना बळी पडून स्वतः सह येणाऱ्या पिढीला नुकसान पोहचविण्याचे काम चालू आहे त्यामुळे येणाऱ्या पिढीला बरबाद होण्यापासून वाचविण्यासाठी पुन्हा एकदा बहुजन समाजाला ताकद देण्याचे काम काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपण करणार असून सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी जनतेत जाऊन भाजपचा खोटा मुखवटा जनतेसमोर आणून सत्तेवरून खाली खेचण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहान आ.नाना पटोले यांनी केले.


           महाराष्ट्र प्रदेश ओ.बी.सी.विभागाच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वितरणाचा कार्यक्रम मुंबई तील टिळक भवन येथे सपंन्न झाला या प्रसंगी राज्यातील विविध जिल्हाध्यक्षांना नाना पटोले यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले,ठाणे शहर(जिल्हा)काॅग्रेसच्या ओ.बी.सी.विभाग अध्यक्षपदि पुनश्च एकदा राहुल पिंगळे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश ओ.बी.सी.विभाग अध्यक्ष भानुदास माळी,माजी मंत्री सुनिल देशमुख,पुण्याच्या माजी महापौर दीप्ती चौधरी,प्रदेश काँग्रेसच्या प्रभारी सोनल पटेल,रायगड काँग्रेस चे अध्यक्ष महिंद्र घरत आदि पदाधिकारी उपस्थित होते.


              या प्रसंगी बोलताना नाना पटोले यांनी सागितले की,ओबीसीला संपविण्याचे काम भाजप सरकार करीत असून शेतकरी प्रश्नांवर गंभीर नसल्यामुळेच मी मोदींशी मतभेद करून खासदारकीचा राजीनामा देऊन सत्तेतून बाहेर पडलो पण काँग्रेसच्या माध्यमातून ओबीसी समाजाला हक्क मिळवून देण्यासाठी जीवाचे रान करेल पण ओबीसी बहुजन समाजाला संविधानातील अधिकारांवर गदा येऊन देणार नाही असे सांगितले.


          या कार्यक्रमात बोलताना काँग्रेस ओ.बी.सी.विभाग प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी बोलताना लवकरच पनवेल येथे ओ.बी.सी.विभागातील पदाधिकाऱ्यांचे अधिवेशन घेण्यात येणार असल्याचे सांगून नवीन पदाधिकारी निवडताना ज्या पदाधिकाऱ्यांनी उल्लेखनीय काम केले अशा पदाधिकाऱ्यांना पुनश्च एकदा नेमण्यात आले असल्याची माहीती दिली प्रदेशच्या नवीन कार्यकारिणीत ठाण्यातील नितीन घोलप  उपाध्यक्षपदी , सरचिटणीसपदी भोलानाथ पाटील, सचिवपदी राकेश पूर्णेकर , संघटकपदी सुरेश पाटीलखेडे,हिंदुराव गळवे यांनाही याप्रसंगी नियुक्तीपत्र पत्र देण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments