अ.भा.वि.प.च्या वतीने "संविधान दिन" व "उद्दिष्टे" यावर संवाद सत्र संपन्न


कल्याण : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शहापूरच्या वतीने संविधान दिनानिमित्त माध्यमिक विद्यालय मु. पो. अंदाड ता. शहापूर या माध्यमिक शाळेत "संविधान दिन" व "उद्दिष्टे" यावर संवाद सत्र आणि विविध स्पर्धा असा दुहेरी कार्यक्रम आनंददायीप्रेरणादायीचेतनदायी वातावरणात संपन्न झाला. यावेळी जेष्ठ शास्त्रज्ञ प्रा. भगवान चक्रदेवसंस्था विश्वस्त नरेंद्र कुलकर्णीअखिल भारतीय विद्यार्थी परिषद कल्याण शहर मंत्री अमोल शिंदेकल्याण शहर सहमंत्री समदिशा हरवंदे उपस्थित होते.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अमूल्य कार्यघटना त्याची अंमलबजावणी वैशिष्ट्य याचा सखोल अभ्यास मांडणी करून वरील वक्त्यांनी मुलांना मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमात विदयार्थ्यांमध्ये संविधान उद्देशिकेचे प्रत वाटप करण्यात आले. वंदे मातरम व राष्ट्रीय गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment

0 Comments