मंदिर कारवाई प्रश्नावर सोमवारी आयुक्तांच्या बैठकीत निघणार तोडगा

  

■कोळी महासंघाचे अध्यक्ष आमदार रमेश पाटील यांच्या शिष्टमंडळाने घेतली पोलीस उपायुक्तांची भेट..


कल्याण, कुणाल  म्हात्रे  : मोहने येथील गावदेवी मंदिरावरील कारवाई प्रश्नावर सोमवारी आयुक्तांच्या बैठकीत निघणार तोडगा निघणार असून आज कोळी महासंघाचे अध्यक्ष आमदार रमेश पाटील यांच्या शिष्टमंडळाने कल्याण परिमंडळ ३ च्या पोलीस उपायुक्तांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली. यावेळी आमदार रमेश पाटील यांच्यासह कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर, माजी आमदार नरेंद्र पवार, कॉंग्रेसचे नेते प्रकाश मुथा, मनसेचे राहुल कोट आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.


मोहने गाव परिसरातील जीर्णोद्धार सुरु असलेल्या गावदेवी मंदिराच्या चौथर्यावर महापालिकेच्या  "अ" प्रभाग क्षेत्र सहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांच्या पथकाने बुधवारी तोडक कारवाई केल्याने तसेच गुन्हा दाखल प्रकरणी मनपाच्या कारवाई विरोधात ग्रामस्थानी एलगार पुकरला असुन शुक्रवारी कोळी महासंघाचे अध्यक्ष आमदार रमेश पाटीलआमदार विश्वनाथ भोईरमाजी आमदार नरेंद्र पवारयांनी घटनास्थळी भेट देत ग्रामस्थांना शांत राहण्याचे आवाहान केले.  पोलीस उपायुक्तांची भेट घेत  मोहने गावातील १००वर्षी पुर्वीच्या जुन्या गावदेवी मंदिरावर सहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी तोडक कारवाई केल्याने ग्रामस्थांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत.

 
          
          तोडक कारवाई प्रकरणी नोटीस न देता  कारवाई चा बडगा उचलला कसा असा सवाल करीत हेतू पुरस्कार कारवाई केली. तसेच  मनपा प्रशासनाने मंदिराच्या कामात सहकार्य करावेअन्यथा पंचक्रोशीतील ग्रामस्थ  आंदोलनाचा पवित्रा घेणार असल्याने याबाबत चर्चा अंती तोडगा काढवा असा मुद्दा उपस्थित केले. कल्याण परिमंडळ ३ पोलीस उप आयुक्त यांनी सोमवारी कल्याण डोंबिवली मनपा आयुक्त यांच्याशी बैठक लावुन यासंदर्भात मार्ग काढणार असल्याचे सांगितले.

Post a Comment

0 Comments