जीवनाचा रंग बदलणारे रंग मी पाहिले - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले


■दुबईत चित्रकला प्रदर्शनाचे केंद्रियराज्यमंत्री आठवलेंच्या हस्ते उदघाटन...


मुंबई दि..12 - चित्रकला ही रम्य आहे. जीवन रम्य करण्यासाठी कला जोपासली पाहिजे. चित्रकलेसाठी जसे रंग महत्वाचे आहेत तसेच जीवनातही रंग महत्वाचे आहेत. चित्रकलेतून जीवनाचे रंग बदलणारे रंग मी माझ्या जीवनात पाहिले आहेत असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले.


             दुबईमधील भारतीय उच्चायुक्तलयात संयुक्त अरब अमिरातीमधील चित्रकारांचे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या चित्रप्रदर्शनाचे उदघाटन केंद्रियराज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या हस्ते आज करण्यात आले.यावेळी भारताचे यूएई मधील  कोंसुल जनरल डॉ अमन पुरी  उपस्थित होते.


           चित्तकला प्रदर्शनात 50 पेक्षा अधिक चित्रकारांच्या चित्रांचा समावेश आहे. भगवान गौतम बुद्धांचे ; महात्मा गांधी यांच्या  चित्रांचा समावेश या चित्रप्रदर्शनात आहे.भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वे वर्ष  अमृतमहोत्सवी वर्ष विविध उपक्रमांनी साजरे होत आहे.दुबईत चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती ना रामदास आठवले यांनी दिली. 


           केंद्रिय राज्यमंत्री ना.रामदास आठवले हे दुबई दौऱ्यावर असून येत्या दि. 15 नोव्हेंम्बर रोजी भारतात परतणार आहेत.

Post a Comment

0 Comments