राष्ट्रवादीच्या वतीने शहिदांना श्रद्धांजली

 


कल्याण, प्रतिनिधी  : राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने  खारघर येथे 26/11 च्या हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली.


      २६/११ ला आतंकवाद्यांनी मुंबईवर केलेल्या हल्ल्यात अनेक निर्दोष नागरिक, पोलिस आणि सैन्यातील जवानांना आपले प्राण गमवावे लागले होते. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांनामुळे संपूर्ण देशाला दुखः झाले होते. या वीर शहीदांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीच्या वतीने खारघर येथे श्रद्धांजलि कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.


हा कार्यक्रम सफल करण्यासाठी पनवेल शहर उपाध्यक्ष आर. एन. यादव, सुरेश राजवंन,  कृष्णाजी, विजय मयेंकर, संदीप महात्रे, ज्ञानेश्वर शिंदे. नेटकेजी, रामदास नारकर, नेहा पाटिल, राजश्री कदम आदि पदाधिकारी उपस्थित होते.  या कार्यक्रमात खारघर पोलीस स्टेशनचे निरिक्षक संदीप शिंदे यांच्यासह इतर पोलीस अधिकारी देखील उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष सतीश पाटील यांच्या निर्देशानुसार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


Post a Comment

0 Comments