कल्याणतील मंदिरां मधील काकड आरत्यांना माजी आमदार नरेंद्र पवार यांची भेट


कल्याण  , कुणाल  म्हात्रे :  वारकरी संप्रदायामध्ये काकड आरतीला फार पूर्वीपासून महत्त्व असून कल्याणमधील विविध मंदिरातील विविध काकड आरत्यांना माजी आमदार नरेंद्र पवार यांनी भेटी दिल्या.


कासार हाट मधील भक्तिधाम मंदिरगौरीपाडा येथील कर्नाळा देवी मंदिर, आप्पा महाराज लेले समाधी तसेच आयोजक माऊली हरिपाठ मंडळभोईरपाडाआदी मंदिरांना आयोजित केलेल्या काकड आरतीला माजी आमदार नरेंद्र पवार यांनी उपस्थित राहून भजनी मंडळाचे कौतुक केले.


कुंदाताई उगले यांच्या नेतृत्वातील विठ्ठल रुक्मिणी महिला भजन मंडळ आयोजित कार्तिक स्नान महिना काकड आरती कार्यक्रमास भाजपा कल्याण पूर्व मंडळ अध्यक्ष संजय मोरे, ह.भ.प. जगन्नाथ महाराज नेहरकरह.भ.प. चंद्रभान महाराज सांगळे ह.भ.प.  विठ्ठल महाराज साबळे ह.भ.प. हरिभाऊ आवटी मृत्युंजय वेद शुक्ला यासोबतच भाजपा कल्याण जिल्हा सरचिटणीस अर्जुन म्हात्रेकल्याण शहर उपाध्यक्ष भगवान म्हात्रेह.भ.प.सांगळे महाराजगावचे पोलिस पाटील ह.भ.प.रघुनाथ म्हात्रेगौरीपाडाटावरीपाडा आणि भोईरपाडा ग्रामस्थ मंडळभजनी मंडळ आदि. उपस्थित होते.


ग्रामीण व शहरी भागातील सर्वच मंदिरामध्ये पहाटेच्या काकड आरतीचा मधुर स्वर निनादतो. त्रिपुरारी पौर्णिमेर्पंत काकड आरतीचा अखंड गजर सुरू असतो. एक महिना चालणारा उत्सव निद्रिस्त देवादिकांना जागविण्यासाठी केला जातोअशी समजूत आहेत. एकेकाळी सर्व गावकरीपरिसरातील लोक एकत्रित सामुहिकपणे काकड आरती करीत. कल्याणमध्ये मात्र ही परंपरा सुरू असून या उपक्रमाचे नरेंद्र पवार यांनी कौतुक केले.

Post a Comment

0 Comments