एक्स्ट्रा मार्क्सची नवीन ब्रँड ओळख

■नवीन लोगो, दृश्य ओळख आणि वर्गवारीतील स्थानाच्या अनावरणाची घोषणा ~


मुंबई, २४ नोव्हेंबर २०२१ : एक्स्ट्रामार्क्स या भारतातील सर्वाधिक विश्वासू एजटेक कंपनीने आपल्या नवीन लोगो, दृश्य ओळख आणि वर्गवारीतील स्थानाच्या अनावरणाची घोषणा केली. या ब्रँडच्या केंद्रस्थानी नवीन दृश्य अ‍ॅसेट्स आहेत. त्यात एक नवीन लोगो आणि वन स्टॉप लर्निंग अ‍ॅप उपाययोजना असून त्यातून एक्स्ट्रामार्क्सची मूल्ये दिसतात- धमाल, एकाग्र करणारे, एकात्मिक आणि सर्वसमावेशक. डिजिटल शिक्षणाकडे आधुनिक दृष्टीकोन देणारे हे नवीन ब्रँडिंग सर्व अंतर्गत आणि बाह्य संवाद वाहिन्यांमध्ये समाविष्ट केले आहे. नवीन लर्निंग अ‍ॅपची नवीन आवृत्ती आयओएस आणि अँड्रॉइड साधनांच्या वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे.


    एक्स्ट्रामार्क्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी रित्विक कुलश्रेष्ठ म्हणाले की, “जागतिक साथ आल्यानंतर संपूर्ण एज्युटेक वर्गाची उत्क्रांती झाली असून नवीन युगातील विद्यार्थ्यांना त्याने आकर्षित केले आहे. यामुळे आम्हाला बदलत्या युगासोबत बदलणे आणि एक्स्ट्रामार्क्सच्या सर्वसमावेशक, भाकितात्मक आणि सर्वांगीण तंत्रज्ञानयुक्त अध्ययन उपाययोजनांच्या विकासाप्रति वचनबद्धता सुनिश्चित करणे शक्य झाले आहे. 


     आमची नवीन ओळख ही मुलांकडून येणारी निरागसता, त्यांचा शिक्षणाबाबतचा उत्साह आणि नवीन संकल्पनाबाबत त्यांची अतीव आवड हे दर्शवणारी आहे. आमच्या लोगोची आणि लर्निंग अ‍ॅपची पुनर्रचना हे आम्ही सर्व वयोगटातील मुलांना देत असलेल्या मूल्याचे प्रतिबिंब आहे- कलात्मक, बहुविध, भविष्याधारित आणि आधुनिक.”


      या अनावरणाचा भाग म्हणून कंपनीचे प्रमुख उत्पादन असलेल्या लर्निंग अ‍ॅपमध्ये संपूर्ण बदल घडले आहेत. एक्स्ट्रामार्क्सने आपली सर्व के-१२, जेईई, नीट वर्गवारी आणि शाळांसाठी आवश्यक असलेले अ‍ॅप्स- जसे असेसमेंट सेंटर्स आणि लाइव्ह क्लास प्लॅटफॉर्म एकच एक्स्ट्रामार्क- लर्निंग अ‍ॅपमध्ये समाविष्ट केले आहेत. त्यामुळे ते विविध वर्गवारींमधील विद्यार्थ्यांसाठी वन स्टॉप अध्ययन केंद्र ठरेल.


       या अ‍ॅपने लर्न-प्रॅक्टिस-टेस्ट या सिद्ध झालेल्या पद्धतीचा वापर केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना सर्वांगीण शिक्षण घेण्यास प्रोत्साहन मिळते. मीडियाने युक्त धडे, लाइव्ह क्लासेस आणि शिकण्यासाठी रेकॉर्ड केलेले धडे यांच्यासह वापरकर्त्यांना गुण वाढवण्यासाठी सराव करणे, जास्त भारित गुण असलेले प्रश्न पाहणे, अमर्यादित शंकानिरसन करणारी प्रत्यक्ष सत्रे मिळवणे, कस्टम परीक्षा तयार करणे आणि सर्वांगीण अध्ययन अनुभवासाठी इतर अनेक आकर्षक वैशिष्टे मिळवणेही शक्य होईल.

Post a Comment

0 Comments