लघु व मध्यम उद्योजकांसाठी ठाण्यात शुक्रवारी मार्गदर्शन मेळावा


ठाणे, दि. १७ ;-  ठाणे मायक्रो स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन आणि उद्यम ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने लघु व मध्यम उद्योग व्यावसायिकांसाठी केंद्र शासनाच्या एम.एस.एम.ई. योजने अंतर्गत मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.


        ठाण्यातील टीप टॉप प्लाझा ठाणे येथे  १९ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता या मेळाव्याचे करण्यात आले आहे. या  मेळाव्यात केंद्र शासनाच्या सरकारच्या एम.एस.एम.ई. खात्याच्या विविध सुविधा व  सुविधांचा लाभ कसा घेता येईल याचे मार्गदर्शन एम.एस.एम.ई.चे मुंबई विभागाचे आयईडीएस डायरेक्टर पी.एम.पार्लेवार करणार आहेत. अधिक माहिती व नोंदणी साठी मधुरेश सिंग ८९३९५०१०१४ आणि रितेश पावसकर ८४३३५९८१११ यांच्याशी संपर्क साधावा.  


       एम.एस.एम.ई. ही केंद्र शासनाच्या अंतर्गत येणारी योजना आहे. एम.एस.एम.ई. अंतर्गत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांना प्रोत्साहन देण्याचे काम केले जाते. या कार्यक्रमाचे आयोजन  ठाणे मायक्रो स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष नरेश पांचाळ, प्रमुख सल्लागार विजय रमेश त्रिपाठी आणि उद्यम ठाणेचे अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments