पोलिस बिट मार्शल्सच्या फेऱ्या पूर्ववत करा... डोंबिवलीकर सुवर्णकारांची मागणीडोंबिवली  (शंकर जाधव )  डोंबिवली शहरात विशेषतः मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत अनेक लहान-मोठे सुवर्णकार कार्यरत आहेत. यामध्ये प्रामुख्याने ज्वेलर्स आणि कलाकुसर कारागीर यांचा समावेश आहे. लॉकडाऊननंतर हळूहळू आता व्यवसाय पूर्वपदावर येण्यास सुरुवात होत असल्याने पोलिस बिट मार्शलच्या प्रत्यक्ष फेऱ्या दुकानात सुरु करण्यात याव्यात, अशी मागणी डोंबिवलीतील गोल्डस्मिथ व ज्वेलर्स असोसिएशनने मानपाडा पोलिसांकडे केली आहे.


        या संदर्भात नुकतीच एक बैठक पार पडली. मानपाडा पोलिस ठाण्याचे वपोनि शेखर बगाडे,  गोल्डस्मिथ व ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष सागरमल जैन, उपाध्यक्ष सुरेश सोनी, चिराग कोठारी, घनःश्याम वैष्णव व अन्य सुवर्णकार उपस्थित होते. पोनि सुरेश मदने यांनी उपस्थित ज्वेलर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलेमानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत डोंबिवली शहराच्या सीमेलगत जवळपास १५०  हून अधिक सुवर्णकार व्यावसायिक आहेत. 


        करोना महामारीनंतर आता उद्योग-व्यवसाय सुरु झाले असले तरी आर्थिक फटका सुवर्णाकार व्यावसायिकांनाही बसला आहे. त्यातच सुवर्ण पेढीत मौल्यवान ऐवज असल्याने सुवर्णकारांनी सीसीटीव्ही व अन्य आधुनिक उपकरणे बसवून उपाययोजना केल्या आहेत. मात्र फिरत्या बिट मार्शलमुळे गुन्हेगारांवर थेट वचक राहात असल्याने प्रत्येक दुकानाकडे दिवसातून दोन फेऱ्या माराव्यात अशी सुवर्णकारांची मागणी असल्याचे संघटनेचे उपाध्यक्ष सुरेश सोनी यांनी मानपाडा पोलिसांकडे केली आहे.


          पोलिस व्यावसायिकांना दक्ष राहण्याची सूचना करत असतात. मात्र तरीही पोलिसांची गुन्हेगारांत दहशत निर्माण झाली पाहिजे, अशी गोल्डस्मिथ व ज्वेलर्स असोसिएशनकडून मागणी करण्यात आली आहे.या संदर्भात नुकतीच एक बैठक पार पडली.

Post a Comment

0 Comments