आजची मुले हिच भारताचे उद्याचे भविष्य; त्यांना चांगले संस्कार द्या – शीफा मेशहर कॉंग्रेसच्या अल्पसंख्याक विभागातर्फे बालदिन साजरा
कल्याण, प्रतिनिधी  : आजची मुले हीच भारताचे उद्याचे भविष्य असून त्यांच्यावर चांगले संस्कार होणे गरजेचे असल्याचे मत कॉंग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या जिल्हा उपाध्यक्षा शीफा मेशहर यांनी व्यक्त केले. कॉंग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त आयोजित बालदिन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.


         यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्त पुष्प अर्पण करत आदराजंली वाहण्यात आली. तसेच लहान मुलांसाठी विविध स्पर्धा देखील घेण्यात आल्या. याप्रसंगी अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष सलीम शेख, उपाध्यक्षा शीफा मेशहर  यांच्यसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.


      देशाच्या स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९८८ ला झाला असून आज त्यांची १३२ वी जयंती आहे. त्यांची हि जयंती बालदिन म्हणून सर्वत्र साजरी केली जाते. त्यानुसार दरवर्षी कॉंग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या वतीने बालदिन साजरा करण्यात येतो. यावर्षी देखील कल्याणमध्ये लहान मुलांच्या विविध स्पर्धा घेऊन त्यांना बक्षिसे आणि खाऊचे वाटप करण्यात आले. 


      जवाहरलाल नेहरू यांना लहान मुलं खूप आवडायची. लहानमुलं हि भारताचे भविष्य असल्याने त्यांच्यावर चांगले संस्कार आणि चांगले शिक्षण देणे गरजेचे असल्याचे मत शीफा मेशहर यांनी व्यक्त केले.   

Post a Comment

0 Comments