कल्याण पूर्वेत केडीएमसीची पाईप लाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वायाकल्याण, कुणाल  म्हात्रे  :  कल्याण पूर्व शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन मंगळवारी सुचकनाका मेन रोड परिसरात सकाळी अचानक फुटल्याने पाण्याचे उंच फवारे उडत लाखो लिटर पाणी वाया गेले. पाईप लाईन फुटल्याची माहिती मिळताच  महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ घटना स्थळी धाव घेत दुरुस्तीचे काम हाती घेतले.     


कल्याण पूर्व शहराला पाणीपुरवठा करणारी ६ मिमी व्यास असलेली पाइपलाइन सोमवारी सकाळी अचानक फुटल्याने १० मीटर उंच पाण्याचे फवारे उडत लाखो लिटर पाणी वाया गेल्याची घटना मंगळवारी घडली असून पालिकेचा कोणीही अधिकारी या ठिकाणी न फिरकल्याने तब्बल अर्धा तास लाखों लीटर पाणी वाया जात होते. कल्याण पूर्वेतील सूचक नाका परिसरात असलेल्या ६ मिमी व्यासाची पाण्याची पाईपलाइन फुटली. 


अर्धा तास  दुरुस्तीच्या कामासाठी कोणी आले नसल्याने लाखों लीटर पाणी वाया गेले आहे. या घटनेची माहिती पालिकेच्या ग प्रभाग क्षेत्र कार्यालयात सांगण्यात आले. अर्ध्या तासानंतर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी ही पाईप लाईन बंद केली असून रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामामुळे ही पाईपलाईन फुटली असल्याचे कनिष्ठ अभियंते सोनवणे यांनी सांगितले. तसेच सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत कोळसेवाडी परिसर पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली.

Post a Comment

0 Comments