रस्त्याच्या अयोग्य पद्धतीच्या कामामुळे नागरिकांना मनस्ताप कल्याण विकासिनीचे आयुक्तांना पत्र

   कल्याण , कुणाल  म्हात्रे  : पावसामुळे महानगरपालिका क्षेत्रातील बहुतांश रस्त्यांवर खड्डे पडले होते. हे खड्डे बुजविण्याचे आणि रस्ताच्या डांबरीकरणाचे काम पालिका क्षेत्रात जोरात सुरु आहे. मात्र काही ठिकाणी हे काम अयोग्य पद्धतीने सुरु असल्याने नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत कल्याण विकासिनीचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक ऍड. उदय रसाळ यांनी पालिका आयुक्तांना पात्राद्वारे तक्रार केली आहे.


कल्याण पूर्वेतील जे प्रभागातील जुनी जनता बँक ते म्हसोबा चौक सुरु असलेले रस्त्याचे काम अतिशय अयोग्यव निकृष्ट पध्दतीने सुरू आहे. निष्काळजी पणाने फक्त एकाच आकाराचे दगडे टाकूनरस्तावर नियमानुसा विविध मापाचे दगडटाकून रीतसर काम सुरु करण्यापूर्वी उपाययोजना करणे आवश्यक होते. परंतु एकच साईजचे दगड टाकून त्यावर रोलर फिरवत आहे.त्या आधी रस्त्यावरील खड्डे धूळ माती कोणत्याच पध्दतीने न काढता अर्ध्या रस्त्यावर दगडे पसरवली जात आहे. वारंवार अशा पध्दतीने थर टाकून रस्ता करुन रस्त्यालगतची घरे दुकाने रस्त्याखालीखड्यात टाकत आहेत. याच मुळे लोकांच्या घरात पावसाळ्यात पाणी जाण्याचे प्रकार घडतात.याआधी हाच रस्ता दोन वेळा अशाच प्रकारे बनविण्यात आला आहे, अशाच प्रकारे अयोग्य पध्दतीने केल्याने याच रस्त्यावर प्रचंड खड्डे नियमित होत आले आहेत. आता पुन्हा याच प्रकारे अयोग्य प्रकारे रस्ता पुन्हा करण्यात येत आहे. दगड गोटे टाकून तीन ते चार दिवस झालेत लोकांना अतिशय त्रासदायक काम झाले आहे तसेच रस्त्यामध्ये असलेल्या ड्रेनेजचे झाकणे यावर दगड गोटे टाकून त्यावर रोलर फिरविण्यात आला आहे. अशा प्रकारे महापालिकेच्या मालमत्तेचे नुकसान करण्यात येत आहे. कोणतीही वर्क ऑर्डर दर्शनी भागावर लावण्यात आली नाही. जबाबदार व्यक्ती उत्तर दयायला नाहीत अशी सर्व परिस्थिती आहे. यांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी उदय रसाळ यांनी पालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.

Post a Comment

0 Comments