दिपावली निमित्त गरीब नागरिकांना मोफत धान्य वाटप, महाराष्ट्र युवा क्रीडा प्रतिष्ठानचा उपक्रम
ठाणे , प्रतिनिधी  : दिपावली निमित्त गरीब नागरिकांना मागील सहा वर्षे मोफत धान्य वाटप करणारे महाराष्ट्र युवा क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने यावर्षी भिवंडी तालुक्यातील आनगाव जवळील बेलपाडा येथील गरीब नागरिकाना मोफत धान्य वाटप करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख अतिथी महाराष्ट्र युवा क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल कदम, सल्लागार सदाशिव गारगोटे उपस्थित होते.


        मदत हेच खरे जीवन असे घोष वाक्य मनामध्ये घेऊन मागील सहा वर्षे गरीब नागरिकांना मदतीकरीता धावून जाणाऱ्या महाराष्ट्र युवा क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली दिपावली निमित्त भिवंडी तालुक्यातील बेलपाडा येथे गरीब नागरिकांना मोफत धान्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गरीब नागरिकांना मदतीकरीता धावून जाणाऱ्या या प्रतिष्ठानच्या वतीने विविध उपक्रम राज्यभरात घेतले जातात. 


        मागील काही महिन्यात पावसाने कोकनात हाहाकार केला होता. चिपळूण, सातारा परिसरातील गावे पाण्याखाली गेली होती तर डोंगर परिसरात दरड कोसळली होती. यावेळी देखील महाराष्ट्र युवा क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने धान्य आणि कपडे मोफत पने वाटप करण्यात आले होते. या वर्षी दिपावली निमित्त गरीब नागरिकांच्या घरात देखील सुखाची आणि आनंदाची दिपावली साजरी व्हावी तसेच अन्नापासून कुणी उपाशी राहू नये, यामुळे प्रतिष्ठानच्या वतीने मोफत पणे धान्य वाटप करण्यात आले.


          यामध्ये तांदूळ, गहू, डाळ, गुळ, साखर, तूरडाळ, रवा, सुगंधी उटणे, मोती साबण देण्यात आले. तसेच ग्रामपंचायत हद्दीमध्ये कोरोना काळात नागरिकांची आरोग्याची वेळीच काळजी घेत सामाजिक कार्य करणारे माजी सरपंच आशा अशोक राऊत यांचा प्रतिष्ठानच्या वतीने कोरोना योद्धा सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. 


         याप्रसंगी महाराष्ट्र युवा क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल कदम, सल्लागार सदाशिव गारगोटे, उपाध्यक्ष अमित मोकाशी, ठाणे जिल्हा अध्यक्षा प्रज्ञा जाधव, सुवर्णा भोईर, सुनीता मामीडाल, संतोष पांडे, विशाल मोकाशी, स्वप्नील चव्हाण, अशोक राऊत, विष्णू कदम तसेच प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.


          कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता नगरसेविका वर्षा मोरे, आकाश कचोले, प्रणवी कदम, नम्रता पाटील यांनी विशेष सहकार्य केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी कुंभार तर आभार प्रदर्शन प्रज्ञा जाधव यांनी केले.

Post a Comment

0 Comments