भिवंडी तालुक्यातील पडघा येथील मातोश्री वृद्धाश्रमातील 69 वृद्धांना कोरोनाची लागण


भिवंडी दि 28( प्रतिनिधी ) तालुक्यातील पडघा नजीकच्या खडवली येथील मातोश्री वृद्धाश्रमातील तब्बल 69 वृद्धांना कोरोनाची लागण झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली असून या सर्व वृद्धांना ठाणे जिल्हा रुग्णालयात  उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे .भिवंडी तालुक्यातील पडघा जवळील खडवली येथे नदीकिनारी मातोश्री वृद्धाश्रम असून त्या ठिकाणी सुमारे शंभर हुन अधिक व्याधीग्रस्त वयोवृद्ध वास्तव्यास आहेत.


          मागील आठवड्यात येथील काही जणांना ताप जाणवू लागल्याने उपचार सुरू करून ही एका वृद्धाचा ताप कमी न झाल्याने त्यांची कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह निघाल्याने खबरदारी म्हणून वृद्धाश्रम व्यवस्थापनाने सर्वांचीच चाचणी केली असता त्यापैकी तब्बल 69 वृद्धांना कोरोना लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून त्यांना सर्वांना उपचारा करीता ठाणे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची महिती वृद्धाश्रम व्यवस्थापक अशोक पाटील यांनी दिली आहे .

Post a Comment

0 Comments