डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या 65 व्या महापरिनिर्वाणदिनाच्या पूर्वतयारीसाठी केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले आढावा बैठक घेणारमुंबई दि.1 : -  भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त मुंबईत चैत्यभूमी येथे  येत्या 6 डिसेंबर रोजी करण्यात येणाऱ्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले उद्या मंगळवार दि.2 नोव्हेंबर रोजी मलबार हिल येथील सहयाद्री अतिथीगृहात आढावा बैठक घेणार आहेत.


             डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या यंदाच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिना च्या पूर्वतयारीबाबतच्या आढावा बैठकीसाठी केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत 


           मुंबई महापालिका; पोलीस; राज्य शासन ;रेल्वे  आणि  समाज कल्याण यासह सर्व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची  संयुक्त बैठक उद्या दि. 2 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 3 वाजता सहयाद्री अतिथीगृह मलबार हिल येथे आयोजित केली आहे.

Post a Comment

0 Comments