भिवंडीतील 4 शिक्षकांना खान्देशरत्न भास्कराचार्य आदर्श शिक्षक पुरस्कार


भिवंडी दि 28(प्रतिनिधी ) शहरातील नामांकित असलेल्या  पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय व कनिष्ठ विद्यालयातील चार शिक्षकांना उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळातर्फे, खान्देशरत्न भास्कराचार्य आदर्श शिक्षक पुरस्कार - 2021 देऊन सन्मानित करण्यात आले आहे..


              या विद्यालयातील शिक्षक  आर.एस.शिंदे सर, व्ही.एस.बिरारी सर,.बी.के.ह्याळीस सर,.एन.बी.पाटील सर यांचा केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री  कपिल पाटील  यांचे प्रमुख उपस्थितीत चाळीसगाव आमदार मंगेश चव्हाण ,  यांचे हस्ते  खान्देशरत्न भास्कराचार्य आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.


             ठाणे जिल्हा अतिरिक्त समादेशक आर.एस.पी.  आर.एस.शिंदे सर, आर.एस.पी.कमांडर,मनीलाल शिंपी सर,भिवंडी शहर आर.एस.पी.समादेशक  विश्वनाथ बिरारी सर, भिवंडी तालुका आर.एस.पी.समादेशक अकबर पिंजारी सर, विजय देवरे सर,  आर.एस.पी. अधिकारी भिवंडी आर एस पी युनिट कल्याण शहर व भिवंडी शहर  यांचेकडून केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री भारत सरकार कपिल पाटील  यांना हेलिपॅडवर सलामी व मानवंदना  देऊन सन्मानित करण्यात आले.


           यावेळी पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भिवंडी विद्यालयाचे प्राचार्य  जी.ओ.माळी सर यांच्याकडुन मंत्रीमोहदयांचे हेलिपॅडवर पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी  उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाचे अध्यक्ष  विकास पाटील सर व उपाध्यक्ष एन.एम.भामरे सर व कल्याण शहर भाजपचे प्रमुख पदाधिकारी बहुसंख्य कार्यकर्ते हेलिपॅडवर उपस्थित होते..

Post a Comment

0 Comments