विठ्ठलवाडी एसटी आगारातील कर्मचार्यांची संपात उडी 300 कर्मचाऱ्यांचा संपात सहभाग

 



कल्याण , कुणाल म्हात्रे  :  महाराष्ट्रभरात विविध ठिकाणी एसटी कामगारांकडून सध्या संप पुकारला गेला आहे. या संपात आता विठ्ठलवाडी एसटी आगारातील कर्मचारी देखील उतरले आहेत. दरम्यान आज आगाराबाहेर कर्मचाऱ्यांनी एकत्र येत संपाची घोषणा करीत निदर्शने केली.


        एसटी म्हणजेच महाराष्ट्राची जीवनवाहिनी मानली जाते. मात्र याच एसटीला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठ्या हलाखीचे जीवन काढावे लागत आहे. अगदी कमी पैशात या कर्मचार्यांना राबवले जात असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. मात्र सरकारी नोकरी आणि कुटुंबाच्या भवितव्यासाठी हाल अपेष्टा कर्मचारी सहन करीत आहेत. एसटी महामंडळ राज्य शासनामध्ये  विलीन करण्याची मागणी  कर्मचारी करत  आहेत. या परिस्थितीच्या अनुषंगाने शासना विरोधात कामगारांनी महाराष्ट्रभरात संप पुकारला आहे.


          रविवार  पासून विठ्ठलवाडी एसटी आगारातील ३०० कर्मचाऱ्यांनी देखील या संपात उडी घेतली आहे. कर्मचाऱ्यांकडून एसटी आगाराबाहेर निदर्शने करण्यात आली. आमचा कोणत्याही युनियन,संघटना तसेच समितीवर विश्वास राहिलेला नसून आता आमचा लढा फक्त आमच्यासाठी असल्याच्या भावना यावेळी कामगारांनी बोलून दाखवल्या. मागण्या पूर्ण करा अन्यथा संप सुरू ठेवू असा इशारा राज्य सरकारला देण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments