भिवंडीत मेट्रो काम सुरू असलेल्या ठिकाणी अपघात लोखंडी पिलरच्या सळईंचा सांगाडा कोसळला, पाच कामगार जखमी ,3 गंभीर...


भिवंडी दि 13( प्रतिनिधी ) ठाणे भिवंडी कल्याण या मेट्रो प्रकल्प 5 चे काम सुरू असून ठाणे ते धामणकर नाका या दरम्यान पहिल्या टप्प्यातील काम युद्धपातळीवर सुरू असताना भिवंडी तालुक्यातील राहनाळ ग्रामपंचायत हद्दीतील अंजूरफाटा येथील मराठा पंजाब हॉटेल समोर दुपारी तीन वाजताच्या सुमारास पिलर चे काम सुरू असून सुमारे 30 ते 40 फूट उंचीचा लोखंडी सळईंचा सांगडा दुपारी 3 वाजताच्या सुमारास कोसळून झालेल्या अपघातात 5 कामगार जखमी झाले असून त्यापैकी तीन कामगारांना गंभीर दुखापत झाली आहे .


            लोखंडी सळईं चा सांगाडा रस्त्याच्या मधोमध उभारला जात असून नजीकचा रस्ता वर्दळीचा असताना सुदैव म्हणजे हा सांगाडा रस्त्याच्या मध्ये कोसळला परंतु त्यावेळी कोणतेही वाहन त्या ठिकाणाहून जात नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे .


           हया दुर्घटने नंतर स्थानिक नारपोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिकांच्या मदतीने मोहम्मद शाहरुख,मोहम्मद मोहबुत,मोहम्मद अब्दुल अहद,मोहम्मद शकील ,मोहम्मद नावेद या जखमी कामगारांना नजीकच्या शुश्रूषा रुग्णालयात दाखल केले आहे .यामुळे या मार्गा वरील दोन्ही बाजू कडील मार्गिके वर वाहतूक कोंडी झाली होती, मात्र यावर बोलण्यास मेट्रो, आणि पोलीस प्रशासनाने नकार दिला आहे...

Post a Comment

0 Comments