कल्याण ग्रामीण भागात वर्षाला 2 हजार आदिवासी महिलांना मोफत सॅनिटरी पॅडचे होणार वितरण


डोंबिवली  ( शंकर जाधव )  कल्याणच्या ग्रामीण भागात आदर्श उपक्रमाला सुरुवात म्हारळ गावातील सामाजिक कार्यकर्ता निकेत व्यवहारे यांच्या पुढाकाराने करण्यात येत आहे. नवीन संकल्पना म्हणून कल्याणच्या वेगवेगळ्या आदिवासी भागांत जाऊन 2000 आदिवासीं महिलांना मोफत सॅनिटरीपॅड वाटप करण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे.


      प्रत्येक महिन्याला जवळपास 150 ते 200 महिलांना याचा लाभ होणार आहे. या अगोदर देखील युवकांच्यावतीने वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. जानेवारी महिन्यात होणाऱ्या मकरसंक्रात सणानिमित्त ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा हळदी-कुंकाचा कार्यक्रम कल्याणच्या ग्रामीण भागात होणार आहे. हळदी-कुंकू समारंभामध्ये इतर साहित्य वाटप न करता जवळपास 1000 महिलांना मोफत सॅनेटरीपॅडचे वितरण करण्याचे ठरविले आहे. 


          यावेळी शिवव्याख्याते कु. शुभम खळदकर यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देखील आवाहन केले आहे की, आपल्या वाढदिवसानिमित्त वायफळ खर्च न करता या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे. स्व. रोहितभाई भोईर प्रतिष्ठान, अष्टविनायक मित्र मंडळ, समर्थ मिञ मंडळ, मिशन माय म्हारळ, उल्हासनदी बचाव कृती समिती, सिद्धिविनायक सेवा मंडळाचा महिलावर्ग आणि ग्रामीण भागातील महिला बचत गट, तसेच उल्हासनगर, कल्याण भागांतील सर्व पत्रकार बांधवांसह अनेक सामाजिक संस्थांचे मोलाचे सहकार्य लाभत असते.

Post a Comment

0 Comments