14नोव्हेंबर ते 29 पर्यत काँग्रेसचे राज्यव्यापी जनजागरण अभियान


ठाणे , प्रतिनिधी  :  अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या निर्देशानुसार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात दि.14 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर पर्यंत राज्यव्यापी जनजागरण अभियान राबविण्यात येणार असल्याची माहीती आज काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.


           ठाणे शहर काॅग्रेसच्या वतीने आज शहर मध्यवर्ती काॅग्रेस कार्यालयात एक पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते,या प्रसंगी ठाणे काँग्रेसचे शहराध्यक्ष अँड.विक्रांत चव्हाण,प्रदेश काँग्रेस सचिव व ठाणे शहर काॅग्रेस सहप्रभारी आनंद सिंग,प्रदेश काँग्रेस सचिव प्रदिप राव,महेश कांबळे,शहर काँग्रेस सरचिटणीस सचिन शिंदे,प्रदेश काँग्रेस सदस्य सुखदेव घोलप,राम भोसले,भालचंद्र महाडिक,महेंद्र म्हात्रे व रमेश इंदिसे आदि पदाधिकारी उपस्थित होते .


            या प्रसंगी बोलताना विक्रांत चव्हाण यांनी सांगितले केंद्रातील भारतीय जनता पार्टीच्या काही धोरणात्मक निर्णयामुळे सर्व सामान्य जनता हवालदिल झाली असून देशातील व्यापार उद्योगात याचा खूप मोठा फटका बसला आहे साहजिकच त्याच्या परिणाम सर्व क्षेत्रातील संबधितांना बसत आहे.


          काँग्रेस पक्ष या विरोधात सातत्याने जनआदोलन करित आली आहे तरिही केंद्रातील भा.ज.पा.सरकारला जाग येत नसून आता जनजागरण अभियानाच्या माध्यमातून जनजागृती करणार असल्याचे सागितले या पत्रकार परिषदेत उपस्थित असलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव व सहप्रभारी आनंद सिंग यांनी सांगितले की,संपूर्ण महाराष्ट्रात हे जनजागरण अभियान राबविण्यात येणार असून 14 नोव्हेंबर रोजी भारताचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती दिनी हे अभियान सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगून संविधान दिनी म्हणजेच 29 नोव्हेंबर पर्यंत हे अभियान चालू राहणार असून संपूर्ण शहरातील विविध भागात हे अभियान राबविण्यात येणार आहे या अभियानात प्रामुख्याने वाढती महागाई,वाढती बेरोजगारी बाबत जनतेमध्ये जाऊन जनजागरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments