काँग्रेसचे 1 लाख सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट ठाण्यातील SRD प्रकल्पाची चौकशी करा...


काँग्रेसची मागणीवकाँग्रेसचा स्वबळावर लढण्याचा निर्धार काँग्रेसने घेतलेल्या हरकतीवर निवडणूक आयोगाकडून दखल..


ठाणे , प्रतिनिधी  :  ठाण्यातील काँग्रेस पक्षाची सदस्य नोंदणीचे प्रारंभ करण्यात आला असून या सदस्य नोंदणी मोहिमेत ठाण्यात 1 लाख सदस्य नोंदविण्याचे उद्दिष्ट आहे,आगामी ठाणे महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढणार असून त्याप्रमाणेच तयारी चालू असल्याचे स्पष्ट केले.


            भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सदस्य नोंदणीला प्रारंभ झाला असून ठाणे शहर(जिल्हा)काँग्रेसच्या वतीने आज या सदस्य नोंदणी अभियानाला प्रारंभ करण्यात आला याप्रसंगी ठाणे काँग्रेस अध्यक्ष अॅड.विक्रांत चव्हाण,प्रदेश काँग्रेस सचिव मनोज शिंदे,प्रदिप राव,अनिस कुरेशी,ठाणै काँग्रेस मुख्य प्रवक्ते सचिन शिंदे,प्रदेश सदस्य राजेश जाधव,सुखदेव घोलप,राम भोसले,जे.बी.यादव,राम भोसले,जेष्ठ उपाध्यक्ष भालचंद्र महाडिक,महेंद्र म्हात्रे,ब्लाॅकअध्यक्ष संदिप शिंदे,संतोष जोशी,श्रीकांत गाडीलकर,प्रवक्ते रमेश इंदिसे,गिरीश कोळी,मंजूर खत्री आदि मान्यवर उपस्थित होते.


           या प्रसंगी बोलताना विक्रांत चव्हाण यांनी सागितले की,आगामी निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढविण्यास सक्षम असून प्रसंग आल्यास आम्ही आमची ताकद दाखवून योग्य प्रत्युत्तर देउ असा विश्वास व्यक्त करीत असताना काँग्रेस पक्षाच्या वतीने यापूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर काही महत्वाच्या एकूण भ्रष्टाचाराबाबत 16 सूचना केल्या होत्या त्याची निवडणूक आयोगाकडून त्वरित दखल घेऊन ठाणे महानगर पालिकेकडून कडून खुलासा मागविला असल्याची माहिती दिली.


            या प्रसंगी बोलताना विक्रांत चव्हाण यांनी सागितले की,ठाण्यातील विविध भागात चालू असलेल्या SRD प्रकल्पात काही विकासक,प्रमोटर व आजी,माजी लोकप्रतिनिधींकडून साटेलोटे करण्यात येत असून मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांना दमदाटी करण्यात येत असल्यामुळे काही प्रकल्प रखडले आहेत या सर्व बाबी विचारात घेऊन SRD प्रकल्पासाठी स्वतंत्र सेल निर्माण करून या सर्व प्रकल्पाची चौकशी करण्याची मागणी केली असल्याची माहिती दिली.


              या प्रसंगी सदस्य नोंदणी अभियानाची प्रारंभ करित असताना प्रदेश काँग्रेस सचिव मनोज शिंदे यांनी सांगितले की ठाण्यातील प्रत्येक भागातील कार्यकर्ते वेगवेगळ्या परिसरात विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येणार असून कीमान ठाण्यातून 1 लाख सदस्य नोंदणी करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे,या नोंदणी मुले ठाण्यात काँग्रेसचे 4 हजार कार्यकर्ते हे क्रियाशील सदस्य म्हणून नोंदणी होईल अशी माहीती त्यानी शेवटी दिली.

Post a Comment

0 Comments