जिल्ह्यात पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता विजा चमकताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये- जिल्हा प्रशासना कडून सतर्कतेचा इशारा
ठाणे, दि.७ (जिमाका ): भारतीय हवामान विभागाने दिलेल्या  सुचनेनुसार जिल्ह्यात आज दि. ०७ ते दि. १२ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत विजांच्या गडगडाटासह तसेच काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.            विजा चमकत असल्यास नागरिकांनी घराबाहेर पडू नये, मच्छिमार बांधवांनी मासेमारीसाठी जाऊ नये, असे आवाहन जिल्हा आपत्ती प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम परदेशी यांनी केले आहे.             विजा चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये त्याचबरोबर समुद्र किनाऱ्यावरील गावांना सावधनतेचा इशारा क्षेत्रीय प्रशासकीय यंत्रणांनी द्यावा, अशा सूचनाही श्री. परदेशी यांनी दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments