केंद्राच्या ‘सुदर्शन भारत परिक्रमे’च्या स्वागताचा मान ठाणेकर नागरिकाला!
ठाणे (प्रतिनिधी) - भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने ‘सुदर्शन भारत परिक्रमा’ आयोजित केली आहे. सुमारे 51 एनएसजी गार्ड या परिक्रमेत सहभागी झाले असून सध्या ही परिक्रमा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. या परिक्रमेत सहभागी होण्याचा मान ठाणेकर नागरिक सुरेंद्र उपाध्याय यांना मिळाला आहे.             देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुदर्शन भारत परिक्रमा आयोजित केली आहे. या परिक्रमेसाठी टाटा कंपनीने आपल्या 18 हॅरियर गाड्या सरकारला दिल्या आहेत. या गाड्यांमधून एनएसजीचे सुमारे 51 जवान सहभागी झाले आहेत.            एनएसजीची ही कार रॅली देशाचा 12 राज्यांमधील  काकोरी स्मारक, भारत माता मंदिर, नेताजी भवन, स्वराज आश्रम, टिळक घाट, फ्रिडम पार्क, ऑगस्ट क्रांती मैदान, मणीभवन, साबरमती या 18 प्रमुख शहरांतील शहिद स्मारकांना भेट देऊन नवी दिल्लीतील लाल किल्ला येथे समारोप होणार आहे. त्यानुसार  रविवारी सायंकाळी ही रॅली महाराष्ट्रामध्ये दाखल झाली.             महाराष्ट्रात आल्यानंतर या रॅलीने पहिला थांबा पनवेल येथील हेरिटेज मोटार्स येथे घेतला. या एनएसजी गार्डच्या स्वागताचा मान यावेळी हेरीटेज मोटार्सचे संचालक सुरेंद्र उपाध्याय यांना मिळाला. यावेळी संतोष तिवारी हेदेखील उपस्थित होते.            या 51 एनएसजी गार्डचे उपाध्याय यांनी स्वागत तसेच सत्कार केला. विशेष म्हणजे, एनएसजीच्या जवानांनीही उपाध्याय यांना त्यांची मानाची टोपी आणि प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचा गौरव केला. या संदर्भात उपाध्याय यांनी सांगितले की, एनएसजीच्या या परिक्रमेचे स्वागत करण्याचा मान मला मिळणे हा माझे सौभाग्य समजतो. मात्र, हा मान माझ्या एकट्याचा नसून तमाम ठाणे-पनवेलकरांचा आहे.

Post a Comment

0 Comments