नवी मुंबईत भव्य शिबिराचे आयोजन

 नवी मुंबई, दि. २३  : -  येथील पनवेल रेल्वे स्थानकावर भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात नेत्रतपासणी, सामान्य तपासणी त्याचप्रमाणे अनेकांनी मोठ्या प्रमाणावर रक्तदान केले.              या शिबिराला पनवेल रेल्वे विभागानेही सहकार्य करीत शिबिरासाठी जागा उपलब्ध करून दिली. नायर रुग्णालयाच्या वतीने प्रगती राजेश सोंडे हिने नेत्रतपासणी शिबिर घेतले. याचा फायदा अनेकांनी घेत आपले डोळे तपासून घेतले. या तपासणीत ज्यांना नेत्रविकार आढळून आला अशा रुग्णांना पुढील उपचार करण्याचे मार्गदर्शन करण्यात आले.            राज्यात सध्या रक्ताचा तुटवडा असल्याने या शिबिरात रक्तदान करण्याचे आवाहन आवाहन करण्यात आले होते. त्याला अनेकांनी प्रतिसाद दिला. तसेच अपोलो रुग्णालय व नवी मुंबई मनपाच्या रुग्णालयाने ही या शिबिरात भाग घेतला होता. लायन्स क्लब नवी मुंबई यांच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

Post a Comment

0 Comments