भिवंडी पालिके वतीने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत साडेचार हजार ओला व सुका कचरा विलगिकरण कचरा कुंड्यां चे वितरण...
भिवंडी दि 1(प्रतिनिधी ) महानगरपालिका क्षेत्रात अनेक गृहनिर्माण सोसायटी मध्ये जमा होणार ओला व सुका कचरा याचे विलगीकरण करून तो जमा करता यावा या करीता तब्बल 4 हजार 500 कचरा कुंडी यांचे वितरण गृहनिर्माण संस्थांना करण्यात येणार असून त्याचा शुभारंभ व त्या सोबतच कचरा गोळा करणाऱ्या तीन यांत्रिक कॉम्पॅक्टर याचा लोकार्पण सोहळा महापौर प्रतिभा पाटील यांच्या शुभहस्ते आयुक्त सुधाकर देशमुख व पदाधिकारी आदींच्या उपस्थितीत करण्यात आला.
           स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये भिवंडी पालिक्स चांगली कामगिरी केल्याने मानांकन मिळाले असल्याने स्वच्छ सर्वेक्षण 2022 मध्ये प्रशासन, लोकप्रतिनिधी, स्वच्छता कर्मचारी व नागरीक यांनी शहर स्वच्छतेसाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन महापौर प्रतिभा पाटील यांनी केले आहे .

Post a Comment

0 Comments