कल्याण डोंबिवलीत ४१ प्रभागातून निवडले जाणार १२२ नगरसेवक


■कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक प्रथमच पॅनेल पध्दतीने...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आगामी निवडणुका आता तीन सदस्य प्रभाग रचनेनुसार होणार आहेतत्यामुळे प्रत्येक मतदाराला तीन उमेद्वारांना मतदान करावे लागणार. एकूण असे ४१ प्रभाग होणार असून चाळीस प्रभाग तीन असणार आहेततर एक प्रभाग दोन असणार आहे. तर यातून एकूण १२२ नगरसेवक निवडले जाणार आहेत. गेल्या तीन निवडणुकात त्या प्रभागाचे आरक्षण काय होते याचा विचार करून आरक्षण सोडत केली जाते. पन्नास टक्के प्रभाग महिलांसाठी म्हणजेच ४१ प्रभागात ६१ महिला असणारउरलेली आरक्षणे इतरांसाठी असेल अशी माहिती केडीएमसी सचिव संजय जाधव यांनी दिली.


 

प्रभाग रचना ही अत्याधुनिक संगणकीय पद्धतीने होते. त्यामुळे कुणाच्या दबावाखाली  किंवा सोयीस्कर फायद्याची होते हे आरोप बिनबुडाचे आहेत. तसेच खासगी ठेकेदार प्रभाग रचना करणार हेही चुकीचे आहे. प्रभाग रचना मतदार संख्येवर नव्हे तर लोकसंख्येवर आधारित होते. संपूर्ण केडीएमसीची जनगणना किती आहे त्यावर अवलंबून प्रभाग रचना निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार करण्यात येते. निवडणुकीचा पाया ही जनगणना आहे. जनगणनेत प्रगणक गटनिहाय लोकसंख्या मोजली जाते. त्याच प्रगणक गटनिहाय गूगल अर्थ नकाशावर उत्तरेकडून पूर्वेकडे अशा पद्धतीने निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या लोकसंख्यानुसार प्रभाग रचना करण्यात येत असल्याची माहिती संजय जाधव यांनी दिली.अनुसूचित जाती व जमातीच्या लोकसंख्या नोंदीनुसार प्रभाग आरक्षित केले जातात. उरलेले बीसीसी आरक्षण म्हणजेच नागरिकांचा मागास प्रवर्ग व खुला प्रवर्ग असे सोडत काढून आरक्षित केले जातात. त्यात पन्नास टक्के महिलांसाठी आरक्षण आहे. प्रभाग रचना करायला कोणतीही एजन्सी नाही आहे. त्याच्या तांत्रिक कामासाठी गुगल अर्थवर मॅपिंग करून मूळ प्रगणक गट जिकडे आहेत त्या जागेवरच बसणार. त्यासाठी तांत्रिक सल्लागार समिती निवडणूक आयोगाच्या सूचना पाळून हे काम करते. प्रभाग रचनेत नॅशनल हायवेनद्यानालेडीपी रोड तोडायचे नसतात. भौगोलिक सलगता पाहूनच रचना केली जाते.मतदार याद्या विधानसभानूसार वापरल्या जातात. महापालिकेच्या स्वतःच्या मतदार याद्या नसतात. महानगरपालिका यादी बनवताना त्या याद्या उचलल्या जातात आणि प्रभाग रचनेनुसार त्यातील मतदार यादी भाग संदर्भ वेगळे करून  एकत्र यादी केली जाते. विधानसभा यादीत असलेले प्रत्येक नाव पालिका यादीत येतेच. एका प्रभागात नसेल तर शेजारी प्रभागात नक्की असते. यासाठी निवडणुकी पूर्वी प्रारूप यादीत मतदारांनी आपले नाव तपासणे आहे व नसल्यास हरकत घेऊन ते योग्य यादीत येण्यासाठी सतर्क राहणे गरजेचे असल्याचेही संजय जाधव यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments