योगीधाम परिसरात हायटेन्शन वायरचा धोका वाढला


■वादळवाऱ्यामुळे हायटेन्शन वायर तुटल्याने रेल्वेची वाहतूक झाली होती ठप्प हायटेन्शन वायरचे जमिनी पासूनचे अंतर कमी झाल्याने जीवितहानी होण्याची दाट शक्यता  


कल्याण , कुणाल म्हात्रे   : योगीधाम परिसरात हायटेन्शन वायरचा धोका वाढला असून बुधवारी झालेल्या पाउस आणि वादळवाऱ्यामुळे हायटेन्शन वायर तुटल्याने रेल्वेची वाहतूक झाली होती ठप्प झाली होती. या हायटेन्शन वायरचे जमिनीपासूनचे अंतर खूप कमी झाल्याने जीवितहानी होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत भारतीय जनता पार्टीच्या कल्याण जिल्हा महिला सरचिटणीस पुष्पा रत्नपारखी यांनी आयुक्तांना निवेदन देत याबाबत ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.योगीधाम स्थित शीव अमृतधामअमृतधाम, स्विसक्लबनविन बांधकाम चालु असलेले ब्लिसगुरूआत्मन व इतर काहि नविन बांधकाम झालेले व चालु असलेले प्रोजेक्ट पासुन मध्य रेल्वेची हायटेन्शन वायर अगदी जवळून गेली आहे. १६ वर्षांपूर्वी वालधुनी नदीच्या किनारी सीआरझेड पूरनियंत्रण रेषेचे उल्लंघन करूनभरणी करून  हे प्रोजेक्ट बांधकाम करण्यास केडीएमसीतर्फे परवानगी देण्यात आली.  भरणी केल्यामुळेच  हायटेन्शन वायर हिचे जमिनीपासूनचे अंतर खूप कमी झाले.      ६ ऑक्टोबर रोजी पावसासह जोरदार वादळ आले व बिल्डिंगवरील काही पत्रे उडून हायटेन्शन वायर तुटली  मध्य रेल्वेची रेल्वे वाहतूक काही तासांसाठी  बंद पडली तसेच येथे राहणार्या नागरिकांच्या घरातील इलेक्ट्रॉनिक सामानांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मध्य रेल्वे हायटेन्शन वायरशी संबंधित अधिकाऱ्यांनी येऊन ती वायर जोडली परंतु आता तिचे अंतर रस्त्यालगत जमिनीपासून अगदी काहीच फुटांवर असुन जर खालून एखादा ट्रक किंवा एखादे वाहन गेले तर ते नक्कीच दुर्घटनाग्रस्त होईल.१६ वर्षांपुर्वी पालिकेच्या बांधकाम विभागाने  हायटेंशन वायरचे व पूरनियंत्रण रेशेचे कोणतेही नियम न पाळता या प्रकल्पांना परवानगी दिली व यामुळे लोकांच्या जिवाशी खेळ मांडला. मध्यरेल्वेचे अधिकारी ती वायर वर खेचण्यास किंवा शिफ्ट करण्यास तयार असुन येणाऱ्या खर्चा विषयी स्थानिक बिल्डर व पालिकेने एकत्र येऊन हायटेंशन वायरचा तिढा सोडवावा अशी मागणी पुष्पा रत्नपारखी यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments